AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या जनरल नॉलेजची उडवली जातेय खिल्ली; पहा नेमकं काय झालं?

बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी तिच्या नॉलेजची खिल्ली उडवली आहे.

Shehnaaz Gill | शहनाज गिलच्या जनरल नॉलेजची उडवली जातेय खिल्ली; पहा नेमकं काय झालं?
Shehnaaz GillImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 02, 2025 | 3:08 PM
Share

मुंबई : ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री शहनाज गिल तिच्या चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाही. शहनाजचा एक मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ तिच्या पहिल्यावहिल्या बॉलिवूड चित्रपटाच्या सेटवरील आहे. शहनाज लवकरच सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये शहनाजसोबत तिचे दोन सहकलाकार राघव जुयाल आणि सिद्धार्थ निगमसुद्धा पहायला मिळत आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया येत असून अनेकजण शहनाजच्या ‘जनरल नॉलेज’ची खिल्ली उडवत आहेत.

राघव आणि सिद्धार्थसोबत मिळून शहनाज एक गेम खेळत असते. सिद्धार्थ तिला विचारतो की, असा कोणता गेट आहे ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकत नाही? त्यावर शहनाज काही उत्तर देण्याआधीच राघव म्हणतो, “कोलगेट”. त्यानंतर शहनाजसुद्धा तेच उत्तर देते. सिद्धार्थ दुसरा प्रश्न शहनाजला विचारतो, “अशी कोणती सिटी (शहर) आहे जिझे तुम्ही जाऊ शकत नाही?” त्यावर संभ्रमात असलेली शहनाज हैदराबादचं नाव घेते. मग लगेच उत्तर बदलत ती सिटाफेल असं म्हणते. त्यावर सिद्धार्थ संभ्रमात पडले. सिद्धार्थने विचारलेल्या या प्रश्नाचं उत्तर दुसरी एक व्यक्ती देते. तेव्हा शहनाज उत्तर देत म्हणते ‘इलेक्ट्रिसिटी’. हे उत्तर ऐकून सर्वजण हसू लागतात.

View this post on Instagram

A post shared by komal (@komal_arora_16)

सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. यामध्ये कलाकारांची मोठी फौज पहायला मिळाली. या चित्रपटात सलमान खानसोबत पूजा हेगडे, शहनाज गिल, पलक तिवारी, भूमिका चावला, व्यंकटेश डग्गुबती, जगपती बाबू, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल यांच्या भूमिका आहेत. बिग बॉसच्या तेराव्या सिझनमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शहनाजला तिच्या  पहिल्या चित्रपटासाठी 50 लाख रुपये मानधन मिळाल्याचं कळतंय. येत्या 21 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. शहनाज तिच्या सहज आणि विनम्र स्वभावासाठी ओळखली जाते. बिग बॉसच्या घरात असताना तिचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लासोबत जोडलं गेलं होतं. पण सिद्धार्थच्या निधनानंतर ती पूर्णपणे खचली होती. आता पुन्हा एकदा शहनाज इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.