AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill हिला भविष्यात करायचं आहे ‘असं’ काम? इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर शहनाज गिल हिला भविष्यात करायचं आहे 'असं' काम? काय म्हणाली अभिनेत्री... इंडस्ट्रीमध्ये आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल सांगत शहनाज म्हणाली...

Shehnaaz Gill हिला भविष्यात करायचं आहे 'असं' काम? इच्छा व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली...
| Updated on: Apr 25, 2023 | 5:37 PM
Share

मुंबई : बिग बॉसच्या (Bigg Boss 16) घरात पंजाबची कतरिना म्हणून ओळख मिळवलेली शहनाज आज नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध आहे. आज शहनाजच्या ग्लॅमरस आणि हॉट अदांवर चाहते फिदा होतात. पण एक काळ असा होता जेव्हा शहनाजला जाड शरिरामुळे ट्रोल केलं जायचं. पण आता अभिनेत्रीने तिच्या परफेक्ट फिगरने सर्वांना हैराण केलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अभिनेत्रीत अनेक बदल झाले आहेत. ज्यामुळे शहनाजची लोकप्रियता अधिक वाढली आहे. सध्या शहनाज अभिनेता सलमान खान स्टारर ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. दरम्यान अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये झळकल्यानंतर भविष्याबद्दल इच्छा व्यक्त केली आहे. सध्या सर्वत्र शहनाज गिल हिचीच चर्चा आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री शहनाजने इंडस्ट्रीमध्ये आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांबद्दल सांगितंल आहे. झगमगत्या विश्वात अभिनेत्रीला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला. अनेक सिनेमांमधून अभिनेत्रीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आहे. शहनाजला लहान मुलांसारखी दिसत असल्यामुळे संधी नाकारण्यात आली. ज्यामुळे शहनाजला मोठा धक्का बसला. जेव्हा अभिनेत्रीला तिच्या पंजाबी सिनेमाच्या प्रीमियरसाठी बोलावण्यात आलं नाही तेव्हा अभिनेत्रीला मोठा धक्का बसला.

मुलाखतीत शहनाज हिने, भाविष्यातील सिनेमांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. शहनाजने तिला कोणत्या प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करायला आवडेल याबद्दल सांगितलं आहे. शहनाज हिला अशा सिनेमांमध्ये काम करायचं आहे, जे सामान्य लोकांच्या आयुष्याशी निगडीत असतील. पुढे अभिनेत्री राधिका आपटे हिचं नाव घेत शहनाज म्हणाली, ‘मला राधिका आपटे ही साकारत असलेल्या भूमिका करायला आवडतील…’

शहनाजच्या म्हणण्यानुसार, राधिका आपटे हिच्या भूमिका आव्हानात्मक असतात. ज्यामुळे लोकांमध्ये कलाकार म्हणून तुमची चांगली प्रतिमा तयार होते. राधिका आपटे हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री स्पाय कॉमेडी Mrs Undercover सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली. सिनेमा OTT प्लॅटफॉर्म Zee 5 वर प्रदर्शित करण्यात आला आहे.

शहनाज हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्यासोबत शहनाज रिलेशनशिपमध्ये होती. दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगल्या. शिवाय चाहत्यांनी देखील दोघांच्या जोडीला डोक्यावर घेतलं. ‘बिग बॉस’च्या घरात देखील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना प्रचंड आवडली. पण सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे कोलमडली होती. सध्या शहनाज गिल आणि राघव जुयाल यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.