लग्न रद्द केल्याचे स्मृतीने दोन दिवस आधीच दिले होते संकेत, त्या पोस्टने उडवली होती खळबळ, काय होती पोस्ट?; आज अखेर…
Smriti Mandhana: भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिने अखेल लग्न मोडल्याचं कबूल केलं आहे. रविवारी एक पोस्ट करत स्मृती हिने लग्न रद्द केल्याची घोषणा केली.. पण याचे संकेत स्मृतीने दोन दिवसांपूर्वीचे दिले होते.

Smriti Mandhana: भारतीय क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं 23 नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं, पण ते काही झालं नाही. त्यानंतर स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या. अखेर सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत स्मृती हिने लग्न रद्द झाल्याची घोषणा केली. रविवारी एक पोस्ट शेअर करत स्मृती हिने रंगणाऱ्या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. पण दोन दिवसांपूर्वीच स्मृती हिने लग्न रद्द करणार असल्याचं संकेत दिलेलं. त्यानंतर स्मृती हिने पोस्ट केली.
लग्न टळल्यानंतर स्मृती हिची पहिली पोस्ट…
स्मृती मानधना एका लोकप्रिय टूथपेस्ट ब्रँडच्या प्रमोशनल व्हिडिओ दिसली. तिने इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला , ज्यामध्ये तिने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने मौखिक आरोग्याच्या महत्त्वाबद्दल दिलेल्या सल्ल्याची आठवण केली. पण अनेकांच्या एक गोष्ट लक्षात आली आणि ती म्हणजे, स्मृती हिच्या बोटात साखरपुड्याची आंगठी दिसली नाही… पण हा व्हिडीओ स्मृतीच्या साखरपुड्यापूर्वीचा असेल… असं देखील अनेकांनी म्हटलं…
View this post on Instagram
स्मृतीने डिलिट तेले सर्व पोस्ट
सुरुवातीला स्मृती हिच्या वडिलांना हार्टअटॅक आल्याने लग्न पुढे ढकललं असं सांगण्यात आलं. पण काही तासांत स्मृती हिने लग्नापूर्वीच्या सर्व विधिंचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावरुन डिलिट केले …. त्यानंतर चर्चांना उधाण आलं… लग्न रद्द झाल्यानंतर स्मृती सोशल मीडियापासून देखील दूर होती…
लग्न रद्द करण्यात आले आहे – स्मृतीची पोस्ट
‘मी माझं लग्न रद्द करत आहे. त्यामुळे कृपया दोन्ही कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि आम्हाला आमच्या पद्धतीने, आमच्या वेगाने हे सगळं सामावून घेण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी वेळ द्यावा…’ अशी पोस्ट स्मृती हिने केली आहे.
एवढंच नाही तर, पलाश याने कारवाई करणार असल्यासं सांगितलं. पलाशने त्याच्याबाबत खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर दणका देणार असल्याचा थेट इशारा या स्टोरीद्वारे दिला आहे. सध्या पलाश आणि स्मृती यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
