अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांच्या ‘सुंदरतेच्या’ प्रशंसेनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर टीका का?

अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांच्या 'सुंदरतेच्या' प्रशंसेनंतर अमिताभ बच्चन यांच्यावर टीका का?

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जागतिक स्तरावरील अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांची केलेली प्रशंसा वादात सापडली आहे.

प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Jan 23, 2021 | 11:45 PM

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जागतिक स्तरावरील अर्थतज्ज्ञ गिता गोपीनाथ यांची केलेली प्रशंसा वादात सापडली आहे. गिता गोपीनाथ इतक्या सुंदर आहेत की त्यांचा संबंध कुणी अर्थशास्त्राशी लावूच शकत नाही, असं म्हणत बच्चन यांनी त्यांची प्रशंसा केली होती. मात्र, त्यांच्या याच प्रशंसेवरुन बच्चन यांच्यावर टीकेची झोड उठलीय. बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती या आपल्या कार्यक्रमात हे वक्तव्य केलं होतं. याचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होतोय (Social Media users criticize Amitabh Bachchan over his remark on Economist Gita Gopinath).

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी उपस्थित असलेल्या स्पर्धकाला स्क्रिनवर गिता गोपीनाथ यांचा फोटो दाखवून प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी म्हटलं की त्यांचा चेहरा इतका सुंदर आहेत की त्यांचा संबंध कुणी अर्थशास्त्राशी लावूच शकत नाही. अनेकांनी या वक्तव्याला सेक्सिस्ट म्हटलं आहे. तसेच अमिताभ बच्चन सुंदर स्रिया अर्थतज्ज्ञ होऊच शकत नाही, असं अप्रत्यक्षपणे म्हणत असल्याची टीका केलीय.

असं असलं तरी स्वतः गिता गोपीनाथ यांना स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपली प्रशंसा केल्याने आनंद झालाय. त्यांनी आपला तो व्हिडीओ ट्विट करत म्हटलं, “हा क्षण मी कधी विसरु शकेल असं वाटत नाही. या शतकातील महान अभिनेते बिग बी अमिताभ बच्चन यांची मी मोठी चाहती आहे. त्यांनी माझी प्रशंसा करणं खूप मोठी गोष्ट आहे.”

गिता यांच्या या आनंदावर अनेकांनी त्यांना सुनावलं आहे. तसेच ही प्रशंसा नसून लिंगभेद करणारं वक्तव्य असल्याचं म्हटलंय. भारतीय महिला अर्थज्ज्ञ रूपा सुब्रमण्य यांनी म्हटलंय, “ही खूपच सेक्सिट आणि मूर्खपणाची शेरेबाजी आहे. तुम्ही यावर आनंद व्यक्त न करता त्याबद्दल नाराजी व्यक्त करायला हवी होती. तुम्ही त्यांच्या या व्हिडीओवर दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यावरुन तुम्हाला या सेक्सिझमवर काहीच हरकत दिसत नाही.”

रुपा यांच्याशिवाय इतर अनेक महिलांनी बच्चन यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. नमिता गिडवानी यांनी म्हटलं, “मला ब्युटी विथ ब्रेनची प्रतिक्रिया अजिबात आवडलेली नाही. सुंदर दिसणाऱ्या स्त्रिया अर्थतज्ज्ञ होऊ शकत नाही हे वक्तव्य मुर्खपणाचं आहे.”

हेही वाचा :

मै यहां तू वहां’ परिस्थिती सोडवण्याचा प्रयत्न, बिग बींमुळे पोलिस दाम्पत्य आगीतून फुफाट्यात

अमिताभ बच्चन यांनी विरानुष्काच्या मुलीवर केलं ट्वीट, घराणेशाहीचा आरोप करत नेटकरी भडकले

KBC 12 | अमिताभ बच्चन यांनी सोनू सूदचे स्वप्न केले पूर्ण, पहा नेमके काय घडले ते…

व्हिडीओ पाहा :

Social Media users criticize Amitabh Bachchan over his remark on Economist Gita Gopinath

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें