Suriya: मोठ्या मनाचा कलाकार; चाहत्याच्या मृत्यूनंतर उचलला मुलीच्या शिक्षणाचा खर्च, पत्नीलाही दिली नोकरी

रस्ते अपघातात जगदीशचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तो नमक्कल इथल्या सुर्याच्या फॅन क्लबचा सचिव होता. जगदीशच्या मृत्यूबद्दल कळताच सुर्याने त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं.

Suriya: मोठ्या मनाचा कलाकार; चाहत्याच्या मृत्यूनंतर उचलला मुलीच्या शिक्षणाचा खर्च, पत्नीलाही दिली नोकरी
Suriya
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 31, 2022 | 3:33 PM

दाक्षिणात्य अभिनेता सूर्याचा (Suriya) तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या चाहत्यांसाठी जमेल ती मदत करण्यास तो नेहमीच सज्ज असतो. नुकतंच सूर्याच्या एका चाहत्याचं अपघातात निधन झालं. जगदीश (Jagadish) असं त्या चाहत्याचं नाव होतं. जगदीशच्या निधनानंतर खुद्द सूर्याने त्याच्या घरी जाऊन कुटुंबीयांचं सांत्वन केलं. इतकंच नव्हे तर त्याने जगदीशच्या कुटुंबीयांना मदत करणार असल्याचंही जाहीर केलं. रस्ते अपघातात जगदीशचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तो नमक्कल इथल्या सुर्याच्या फॅन क्लबचा सचिव होता. जगदीशच्या मृत्यूबद्दल कळताच सुर्याने त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत करण्याचं आश्वासन दिलं. सुर्याने जगदीशच्या पत्नीला नोकरी देण्याचं आणि मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याचं आश्वासन दिलं.

सुर्याच्या भेटीची बातमी त्याच्या फोटोसह एका फॅन पेजने ट्विटरवर शेअर केली होती. या फोटोमध्ये सूर्या त्याच्या चाहत्याच्या फोटोसमोर उभा असल्याचं पहायला मिळत आहे.

पहा फोटो-

सूर्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास, तो सध्या निर्माता बाला यांच्यासोबत एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचं नाव अद्याप निश्चित झालं नाही. जवळपास दोन दशकांनंतर सूर्या आणि बाला एकत्र काम करत आहेत. 2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पितामगन’ या तमिळ चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं होतं.

सुर्याने अलीकडेच बॉलीवूडमध्ये निर्माता म्हणून पदार्पण केलं. त्याची निर्मिती कंपनी 2D एंटरटेनमेंट त्याच्याच चित्रपटाच्या हिंदी रिमेकशी संबंधित आहे, ज्यात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत आहे. ‘सूराराई पोट्रू’ असं या चित्रपटाचं नाव आहे. एअर डेक्कन या बजेट एअरलाइनचे संस्थापक कॅप्टन जीआर गोपीनाथ यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. कमल हासन यांच्या ‘विक्रम’ या चित्रपटातही तो पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें