AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamannaah Bhatia | कुटुंबीयांसोबत ‘लस्ट स्टोरीज 2’मधील इंटिमेट सीन्स पाहताना तमन्नाची झाली अशी अवस्था

तमन्ना भाटियाने तिच्या आतापर्यंतच्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये चित्रपटात एकदाही किसिंग सीन दिला नव्हता. सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन न करण्याचा तिचा नियमच होता. मात्र आता ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटासाठी तिने हा 18 वर्षांचा नियम अखेर मोडला आहे.

Tamannaah Bhatia | कुटुंबीयांसोबत 'लस्ट स्टोरीज 2'मधील इंटिमेट सीन्स पाहताना तमन्नाची झाली अशी अवस्था
Tamannaah BhatiaImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 30, 2023 | 1:53 PM
Share

मुंबई : स्त्रियांच्या कामुक भावनांबद्दल भाष्य करणारा ‘लस्ट स्टोरीज 2’ नुकताच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात चार विविध कथा दाखवण्यात आल्या असून चारही वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. यातील एका कथेत अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सीरिजमध्ये तमन्नाने तिचा 18 वर्षांपासूनचा ‘नो किसिंग’ नियम मोडला आहे. पहिल्यांदा ती रिअल लाइफ बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. मनात कोणताही संकोचलेपणा न ठेवता हा चित्रपट पहा, असं तिने प्रमोशनदरम्यान चाहत्यांना म्हटलं होतं. मात्र जेव्हा स्वत:च्या कुटुंबीयांसमोर ‘लस्ट स्टोरीज 2’ पाहण्याची वेळ आली, तेव्हा मात्र ती वरमली.

‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली, “मी त्या प्रेक्षकांपैकी एक होते, ज्यांना अशा गोष्टी कुटुंबीयांसोबत पाहण्यास अजब वाटतं. इंटिमेट सीन्स सुरू होताच मी इथे-तिथे बघायची. मी घाबरत होते आणि कुटुंबीयांसमोर संकोचलेपणाची भावना होती. माझ्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये मी कोणत्याच चित्रपटात इंटिमेट सीन्स केले नव्हते.”

याविषयी ती पुढे म्हणाली, “माझ्यासाठी हा एका अशा अभिनेत्रीचा प्रवास होता, जिची सुरुवात मोठ्या प्रेक्षकवर्गाच्या गरजांना पूर्ण करण्यापासून झाली. ज्या गोष्टी मला आधी कलंक वाटायच्या त्या आता मोठ्या पडद्यावर अभिनेत्री म्हणून साकारण्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आता प्रेक्षकांच्या बाबतीत असं घडावं अशी माझी इच्छा नाही, कारण त्यांना आता त्याची गरज नाही. तो भ्रम माझ्यासाठी तुटला आहे. म्हणूनच एक कलाकार म्हणून मी स्वत:ला शोधण्यात आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याचा आनंद घेत आहे.”

तमन्ना भाटियाने तिच्या आतापर्यंतच्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये चित्रपटात एकदाही किसिंग सीन दिला नव्हता. सहअभिनेत्यासोबत किसिंग सीन न करण्याचा तिचा नियमच होता. मात्र आता ‘लस्ट स्टोरीज 2’ या चित्रपटासाठी तिने हा 18 वर्षांचा नियम अखेर मोडला आहे. सहअभिनेता आणि बॉयफ्रेंड विजय वर्मासोबत तिचे या चित्रपटात बरेच इंटिमेट सीन्स आहेत. या निर्णयाविषयी बोलताना ती एका मुलाखतीत म्हणाली, “करिअरमध्ये आतापर्यंत कधीच इंटिमेट सीन न करताही दिग्दर्शकांनी मला या भूमिकेसाठी निवडलं, याचं मला फार कौतुक वाटतंय. मोठ्या पडद्यावर मला रोमान्स करताना पाहून प्रेक्षकांना संकोचल्यासारखं वाटेल असं माझं मत होतं. त्यामुळे मी स्क्रीनवर कधीच किसिंग सीन न देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र भारतीय प्रेक्षक हे गेल्या काही वर्षांत बरेच सुजाण झाले आहेत. बोटाच्या एका क्लिकवर त्यांना सगळी माहिती उपलब्ध असते. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून मला साचेबद्ध काम करायचं नव्हतं.”

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.