AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सहकलाकार ते सहचारिणी.. व्ही शांताराम यांच्या बायोपिकमध्ये ‘ही’ अभिनेत्री साकारणार ‘जयश्री’

व्ही. शांताराम यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून अभिजीत देशपांडे त्याचं दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हा व्ही. शांताराम यांची भूमिका साकारणार आहे.

सहकलाकार ते सहचारिणी.. व्ही शांताराम यांच्या बायोपिकमध्ये 'ही' अभिनेत्री साकारणार 'जयश्री'
व्ही. शांताराम यांचा बायोपिकImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 09, 2025 | 11:58 AM
Share

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित ‘व्ही. शांताराम’ या भव्य चित्रपटाचं पहिलं पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता ‘जयश्री’ या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिरेखेची पहिली झलक सादर करण्यात आली आहे. ही भूमिका अभिनेत्री तमन्ना भाटिया साकारत असून, व्ही. शांताराम यांची सहकलाकार ते सहचारिणी असा नाजूक आणि भावस्पर्शी प्रवास या व्यक्तिरेखेतून उलगडणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये तमन्ना भाटिया गुलाबी साडीत, अत्यंत मोहक अंदाजात दिसत आहे. तिच्या व्यक्तिमत्त्वातील सोज्वळता आणि कलात्मकतेची नाजूकता पोस्टरमधून प्रकर्षाने जाणवते.

चित्रपटात ‘जयश्री’ ही केवळ व्ही. शांताराम यांची पत्नी नसून, त्यांच्या आयुष्यातील पहिली प्रेरणा, कलात्मक सहप्रवासी आणि भावनिक आधारस्तंभ म्हणून साकारली जाणार आहे. सहकलाकार म्हणून सुरुवात होऊन विवाहापर्यंतचा प्रवास, प्रेम, तणाव, संवेदनशीलता आणि त्या काळातील सिनेमासृष्टीचं पडद्यामागचं वास्तव या चित्रपटातून उलगडलं जाणार आहे.

निर्मात्यांच्या मते, “जयश्री ही व्यक्तिरेखा भावनांनी आणि कलात्मकतेने ओतप्रोत भरलेली आहे. तमन्ना भाटियाच्या व्यक्तिमत्त्वातील सौंदर्यपूर्ण शालीनता, नैसर्गिक चमक आणि तिच्या डोळ्यांतील भावना या भूमिकेला जिवंत करतात. ती एक उत्कृष्ट अभिनेत्री असून, या भूमिकेत ती जणू त्या काळातून थेट आजच्या पडद्यावर आली आहे असं वाटतं.”

याआधी प्रदर्शित झालेल्या सिद्धांत चतुर्वेदीच्या व्ही. शांताराम यांच्या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती. आता तमन्ना भाटियाच्या ‘जयश्री’च्या पोस्टरमुळे त्या कथेतली भावनिक आणि कलात्मक बाजू अधिक गडद झाली आहे. पडद्यावर व्ही. शांताराम आणि जयश्री यांचं समीकरण, त्यांचा सहप्रवास आणि त्यांच्या नात्यातील गुंफण पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये अधिक वाढली आहे.

हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंट, कॅमेरा टेक फिल्म्स आणि रोअरिंग रिव्हर प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित असून राहुल किरण शांताराम, सुभाष काळे आणि सरिता अश्विन वर्दे हे निर्माते आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं आहे. ‘व्ही. शांताराम’ हा चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार असून, तो भारतीय सिनेमाच्या सुवर्णकाळाला नव्या पिढीसमोर आणणारा एक भव्य आणि भावस्पर्शी सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया...
अजित पवारांच्या निधनावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया....
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी
फडणवीस, शिंदेंकडून सुनेत्रा पवारांचं सांत्वन; बारामतीत अलोट गर्दी.
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल
अजित पवारांच्या निधनाने राज्यावर शोककळा! छगन भुजबळही बारामतीत दाखल.
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या वेळीचा आणखी एक व्हिडीओ समोर.
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?
अजितदादांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी कुठे ठेवलं जाणार?.
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे बारामतीच्या रुग्णालयात दाखल.
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!
Ajit Pawar Death : अजित पवार यांच्या सासरवाडीत कडकडीत बंद!.
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
अजितदादा वाचतील असं वाटलेलं; पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया.
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती
विमान अपघाताचं प्राथमिक कारण काय? मुरलीधर मोहोळांनी दिली माहिती.
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर
अश्रूंचा बांध फुटला! बारामतीत पोहोचताच सुनेत्रा पवार यांना अश्रू अनावर.