बिग बॉसच्या घरात पहिला धक्का, अपेक्षा नव्हती ते घडलं, कोण-कोण पडलं घराबाहेर?

बिग बॉस मराठीच्या घरातून अंकिता वालावलकर बाद झाली आहे. ती टॉप 5 स्पर्धकांपैकी एक होती. पण टॉप 4 पर्यंत तिला जाता आलं नाही. अंकिता वालावलकर ऐनवेळी स्पर्धेतून बाद झाली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

बिग बॉसच्या घरात पहिला धक्का, अपेक्षा नव्हती ते घडलं, कोण-कोण पडलं घराबाहेर?
'बिग बॉस मराठी' सिझन 5
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 8:08 PM

बिग बॉस मराठी सीझन पाचचा टॉप पाचवी स्पर्धक आता घराबाहेर पडली आहे. कोकण हार्टेड गर्ल म्हणून ख्यातनाम असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर घराबाहेर पडली आहे. बिग बॉसमधील खेळामुळे अंकिता वालावलकर हिच्या फॅन फोलोविंगमध्ये प्रचंड वाढ झाली. मालवणी भाषेचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध असेलेली अंकिता वालावलकर या कार्यक्रमात बघायला मिळाली. अंकिताचा प्रामाणिकपणा स्पर्धकांना आवडला. अंकिता मुद्देसूदपणे आपले मुद्दे मांडायची. त्यामुळे तिचा प्रवास ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचला. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर या अंतिम क्षणी घराबाहेर पडल्या, त्या फायनलिस्ट ठरु शकल्या नाहीत. पण अंकिता फायनलिस्ट ठरली. पण अंकिताचा प्रवास टॉप 5 पर्यंतच पोहोचू शकला. अंकिता यांच्या एक्झिटनंतर आता बिग बॉसच्या घरात सुरज चव्हाण, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, निक्की तांबोळी हे स्पर्धक टॉप 4 स्पर्धक ठरले. यानंतर धनंजय पोवार बाद झाले.

अंकिता ही टॉप 3 मध्ये असेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. पण ती टॉप 4 च्या रेसमधूनच बाद झाली. त्यानंतर धनंजय पोवार बाद झाला. त्यामुळे अभिजीत सावंत, सुरज चव्हाण आणि निक्की तांबोळी हे टॉप 3 मध्ये पोहोचले. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेसाठी 6 स्पर्धकांची निवड झाली होती. यामध्ये जान्हवी किल्लेकर हिचाही समावेश होता. पण जान्हवी ग्रँड फिनालेमध्ये सर्वात पहिल्यांदा बाद झाली. पण ती घराबाहेर पडताना तब्बल 9 लाख रुपये घेऊन बाहेर पडली. त्यामुळे तिच्यासाठी तो यशस्वी आणि बेस्ट डील झाल्याचं मानलं जात आहे.

अंकिता बाहेर पडली तेव्हा बिग बॉसने एक टास्क ठेवला होता. या टास्कमध्ये टॉप 5 स्पर्धकांपैकी ज्या स्पर्धकांच्या समोरील डब्ब्यात 2 हजार बीबी करन्सी असतील ते सेफ ठरतील आणि बाद होणाऱ्या स्पर्धकाच्या डब्ब्यात शून्य बीबी करन्सी असेल. त्यानुसार सर्वात आधी धनंजयचा डब्बा उघडण्यात आला. त्याच्या डब्ब्यात 2 हजार बीबी करन्सी आढळले. त्यानंतर सुरजचा डब्बा उघडण्यात आला. त्यामध्येही 2 हजार बीबी करन्सी होती.

हे सुद्धा वाचा

यानंतर निक्की तांबोळीचा डब्बा उघडण्यात आला. त्यामध्ये देखील बीबी करन्सी आढळली. यानंतर अंकिता आणि अभिजीतचा एकत्र डब्बा उघडण्यास सांगितलं गेलं. यावेळी अभिजीतच्या डब्ब्यात 2 हजार बीबी करन्सी आढळली. तर अंकिताच्या डब्ब्यात शून्य बीबी करन्सी आढळली. त्यामुळे अंकिता ही घराबाहेर पडली.

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.