Jai Bhavani Jai Shivaji | भुषण प्रधान साकारणार ‘छत्रपती शिवाजी महाराज’, तर अजिंक्य देव दिसणार ‘बाजीप्रभू’ देशपांडेंच्या भूमिकेत!

नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल.

Jai Bhavani Jai Shivaji | भुषण प्रधान साकारणार ‘छत्रपती शिवाजी महाराज’, तर अजिंक्य देव दिसणार ‘बाजीप्रभू’ देशपांडेंच्या भूमिकेत!
जय भवानी जय शिवाजी

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं, तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांच्या शौर्याची गोष्ट सांगणारी ‘जय भवानी जय शिवाजी’ मालिका 26 जुलैपासून रात्री 10 वाजता स्टार प्रवाहवर सुरु होत आहे (Bhushan Pradhan will play Chhatrapati Shivaji Maharaj while Ajinkya Dev will appear in the role of Bajiprabhu Deshpande in new serial).

नेतोजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, मुरारबाजी देशपांडे, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका या लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल. अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार असून, सुप्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव बाजीप्रभू देशपांडेंच्या भुमिकेत दिसतील. तर, अभिनेता कश्यप परुळेकर नेतोजी पालकरांची भूमिका साकारणार आहे.

हे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न!

या मालिकेविषयी विषयी सांगताना भुषण प्रधान म्हणाला की, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझं देखिल स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यसोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे.’

अजिंक्य देवही उत्सुक!

बाजीप्रभू देशपांडेंची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेते अजिंक्य देवही खुपच उत्सुक आहेत. ‘माझ्या करिअरची सुरुवातच सर्जा सिनेमातल्या ऐतिहासिक व्यक्तिरेखेने झाली होती. त्यामुळे बाजीप्रभू साकारताना प्रचंड आनंद होत आहे. बाजीप्रभूंच्या शौर्याच्या कथा आपण ऐकल्या आहेत, वाचल्या आहेत. पावनखिंडीमध्ये जीवाची बाजी लावत ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले. अश्या या शुरवीराची भूमिका साकारायला मिळणं हे माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे.

या भूमिकेसाठीचा लूकही माझ्यासाठी नवा आहे. फिटनेसच्या बाबतीत मी नेहमीच जागृक असतो. व्यायाम आणि खाण्यावरचं नियंत्रण यामुळेच मी फिट आहे. मी दररोज पाच ते सहा किलोमीटर धावतो. उत्तम आरोग्यासाठी हे सर्व गरजेचं आहे असं मला वाटतं. या सगळ्याचा उपयोग मला जय भवानी जय शिवाजी मालिकेत बाजीप्रभू साकारताना होतो आहे.’

(Bhushan Pradhan will play Chhatrapati Shivaji Maharaj while Ajinkya Dev will appear in the role of Bajiprabhu Deshpande in new serial)

हेही वाचा :

‘राणादा’ला मिळाली ‘अंकिता’ची साथ, नवी जोडी, नवा “डाव”

PHOTO | डोसा, वडापाव, पाणीपुरी, रसगुल्ले अन् दाबेली… ‘स्वीटू’च्या बर्थडे केकवर पक्वानांची मेजवानी!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI