Bigg Boss 15 premiere Live Updates : नवा ड्रामा, नवा धमाका, नवे चेहरे, बिग बॉसच्या घरात अकासा सिंहची एन्ट्री

प्रेक्षकांची ‘बिग बॉस 15’ ची (Bigg Boss 15) प्रतीक्षा संपली आहे. आज (2 ऑक्टोबर) संध्याकाळपासून प्रेक्षकांना दररोज मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळाला असून सलमान खानने (Salman Khan) 15 स्पर्धकांसह त्याच्या शोची सुरुवात केली आहे.

Bigg Boss 15 premiere Live Updates : नवा ड्रामा, नवा धमाका, नवे चेहरे, बिग बॉसच्या घरात अकासा सिंहची एन्ट्री
salman khan

मुंबई : प्रेक्षकांची ‘बिग बॉस 15’ ची (Bigg Boss 15) प्रतीक्षा संपली आहे. आज (2 ऑक्टोबर) संध्याकाळपासून प्रेक्षकांना दररोज मनोरंजनाचा पूर्ण डोस मिळाला असून सलमान खानने (Salman Khan) 15 स्पर्धकांसह त्याच्या शोची सुरुवात केली आहे. ग्रँड प्रीमियर नाईटमध्ये सर्व स्पर्धकांची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे. चाहते आता मजा, विनोद आणि हाणामारी, भांडणे सर्व एकत्र पाहण्यासाठी आता खूप उत्सुक आहेत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 03 Oct 2021 00:31 AM (IST)

  सिंगर अफसाना खानची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

 • 02 Oct 2021 23:45 PM (IST)

  करण कुंद्रा बिग बॉस 15 च्या घरात दाखल

 • 02 Oct 2021 23:42 PM (IST)

  बिग बॉसच्या घरात अकासा सिंहची एन्ट्री

  सिंगर आकासा सिंहची बिग बॉसच्या घरात एन्ट्री झाली आहे.

  आकासाने सलमान खानच्या भारत या चित्रपटामध्ये एत्थे आ हे गाणे गायले आहे.

 • 02 Oct 2021 23:21 PM (IST)

  अभिनेत्री डोनल बिष्ट बिग बॉस 15 च्या घरात दाखल

  डोनल बिष्ट बिग बॉस 15 च्या घरात दाखल झाली आहे.

  डोनल बिस्टने दिल तो हैप्पी है जी, एक दीवाना अशा मालिकांमध्ये काम केलेले आहे.

 • 02 Oct 2021 23:17 PM (IST)

  उमर रियाजही बिग बॉसच्या घरात दाखल

 • 02 Oct 2021 23:14 PM (IST)

  छोट्या पडद्यावरील अभिनेता सिंबा नागपालची राडा करणार, बिग बॉसच्या घरात दाखल

  छोट्या पडद्यावरील अभिनेता सिंबा नागपालची राडा करणार, बिग बॉसच्या घरात दाखल

  बिग बॉस 15 च्या घरात सिंबा नागपालची एन्ट्री झाली आहे. सिंबा पाच नंबरचा कन्टेस्टंट आहे. सिंबाने स्पिल्ट्सविला और शक्ति: अस्तित्व के एहसास या मालिकांमध्ये भूमिका केलेली आहे.

   

 • 02 Oct 2021 23:03 PM (IST)

  बिग बॉसच्या घरात विधी पंड्याची एन्ट्री

  सलमान खान यांचा शो बिग बॉसच्या घरात विधी पंड्याची एन्ट्री झाली आहे. ती चौथ्या नंरबची कंटेस्टंट आहे. विधीने उड़ान, एक-दूजे के वास्ते अशा मालिकांमध्ये भूमिका केलेली आहे.

 • 02 Oct 2021 23:00 PM (IST)

  तेजस्वी प्रकाश आली बिग बॉसच्या घरात

  तेजस्वी प्रकाशदेखील आली बिग बॉसच्या घरात

  तेजस्वीने खतरों के खिलाडी या रियालिटी शोच्या दहाव्या सिझनमध्ये सहभाग नोंदवलेला आहे.

 • 02 Oct 2021 22:58 PM (IST)

  छोट्या पडद्यावरील अभिनेता विशाल कोटियन बिग बॉसच्या घरात

  छोट्या पडद्यावरील अभिनेता विशाल कोटियन बिग बॉसच्या घरात

  अकबर का बल बीरबलसारख्या अनेक मालिकांमध्ये अभिनेता म्हणून काम

 • 02 Oct 2021 22:56 PM (IST)

  पहिला कंटेस्टंच जय भानुशालीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

  पहिला कंटेस्टंच जय भानुशालीची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

  अनेक सिरीयलमध्ये काम केलं आहे जय भानुशालीने

   

 • 02 Oct 2021 22:53 PM (IST)

  बिग बॉसच्या घरात सिंबा नागपालची एन्ट्री

 • 02 Oct 2021 22:50 PM (IST)

  विधी पंड्याचं जबरदस्त परफॉर्मन्स

 • 02 Oct 2021 19:03 PM (IST)

  बिग बॉस 15च्या प्रीमियरला येणार रणवीर सिंह

  ‘बिग बॉस 15’च्या प्रीमियरमध्ये रणवीर सिंहही येणार आहे. वास्तविक, रणवीर त्याच्या शो ‘द बिग पिक्चर’च्या प्रमोशनसाठी येणार आहे.

 • 02 Oct 2021 17:22 PM (IST)

  ‘बिग बॉस 15’ चा पहिला कन्फर्म सदस्य प्रतीक सहजपालचा घरात प्रवेश!

  बिग बॉस ओटीटीच्या ग्रँड फिनालेच्या दिवशी हे उघड झाले की, प्रतीक सहजपाल ‘बिग बॉस 15’मध्ये जाणार आहे. प्रतीक सहजपालसह 14 जणांची नावे जाहीर झाली आहेत. यातील पुष्टी झालेल्या स्पर्धकांच्या नावांमध्ये शमिता शेट्टी, निशांत भट्ट, जय भानुशाली, तेजस्वी प्रकाश, करण कुंद्रा, अक्सा सिंग, डोनल बिष्ट, उमर रियाज, सिम्बा नागपाल, साहिल श्रॉफ आणि पंजाबी गायिका अफसाना खान यांचा समावेश आहे.

 • 02 Oct 2021 17:20 PM (IST)

  ‘बिग बॉस 15’च्या घरात यंदा ‘जंगल’ थीम!

  या वेळी घराचे डिझाईन फिल्ममेकर ओमंग कुमार आणि त्यांची पत्नी वनिता ओमुंग कुमार यांनी जंगल या थीमवर केले आहे. त्यामुळे स्पर्धकाला जंगलात राहावे लागेल, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. वास्तविक, प्रत्येक वेळी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांना लक्झरी लाईफ जगण्याची संधी मिळते, परंतु यावेळी निर्मात्यांनी ते बदलून नवीन तडका लावला आहे, जो लोकांना आवडेल.

 • 02 Oct 2021 17:16 PM (IST)

  कुठे आणि कधी पाहता येईल हा शो?

  कलर्स चॅनेलवर ‘बिग बॉस 15’ आजपासून दररोज पाहता येईल. सोमवार ते शुक्रवार हा शो रात्री 10.30 वाजता प्रक्षेपित होईल. त्याचबरोबर हा कार्यक्रम दर शनिवार आणि रविवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित केला जाईल. यासह, आपण दर वेळी प्रमाणे हा शो वूट अॅपवर देखील पाहू शकता.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI