Bigg Boss Hindi 19: दुसऱ्या आठवड्यात या अभिनेत्रीची वाइल्ड कार्ड एन्ट्री; नाव ऐकूनच चाहते नाराज
बिग बॉस 19 च्या दुसऱ्या आठवड्यात वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून एका अभिनेत्रीचे नाव समोर येत आहे. मात्र तिचं नाव ऐकून चाहत्यांना फारसा आनंद झाला नाही. त्यांनी कमेंट करत इतर स्पर्धकांबद्दलही नाराजी व्यक्त केली आहे.

सलमान खानचा रिअॅलिटी टीव्ही शो बिग बॉस 19 सुरु व्हायला आता काहीच तास उरले आहेत. सर्वांनाच आता त्याबद्दल उत्सुकता आहे. त्याचपद्धतीने शोमध्ये येणाऱ्या काही स्पर्धकांची नावे देखील समोर आली आहेत. तसेच वाइल्ड कार्ड म्हणून कोणते सदस्य येऊ शकतात याबद्दलही चर्चा सुरु आहे. अशाच एका अभिनेत्रीचं नाव सध्या वाइल्ड कार्डच्या लिस्टमध्ये येत आहे. आणि ही अभिनेत्री शो सुरु झाल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात घरात येऊ शकते असंही म्हटलं जात आहे.
या अभिनेत्रीची या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येण्याची शक्यता
‘बिग बॉस 19’ या रिअॅलिटी टीव्ही शोच्या स्पर्धकांची यादी बऱ्याच प्रमाणात क्लिअर झाली आहे. निर्मात्यांनी शोचे प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यास सुरुवात केली आहे ज्यामध्ये अनेक खेळाडूंचे चेहरे जवळजवळ उघड झाले आहेत. दरम्यान, एका वृत्तानुसार म्यूजिक व्हिडीओचा भाग राहिलेली अभिनेत्री प्राची व्होरा या सीझनमध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून येऊ शकते.
या सेलिब्रिटीला वाइल्ड कार्ड एन्ट्री मिळणार आहे
पोस्टनुसार माहिती अशी आहे की , “एक्सक्लुझिव्ह माहिती. बिग बॉस 19 च्या दुसऱ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री होईल का? आमच्या सूत्रांनुसार, निर्माते दुसऱ्या आठवड्यात वाइल्ड कार्ड एन्ट्री म्हणून अभिनेत्री प्राची व्होराचे नाव घेण्याचा विचार करत आहेत. प्राची तिच्या अनेक म्युझिक व्हिडिओंसाठी ओळखली जाते. ती तरुण कलाकारांमध्ये एक फ्रेश चेहरा आहे आणि सौंदर्याचं एक उदाहरण आहे.” शोमध्ये प्राचीला वाइल्ड कार्ड म्हणून आणण्याच्या कल्पनेने लोक आश्चर्यचकित झाले आहेत. चाहत्यांना अनेक सेलिब्रिटी बिग बॉसच्या घरात हवे होते.
View this post on Instagram
प्राचीच्या नावावर लोकांच्या प्रतिक्रिया
एका फॉलोअरने कमेंट बॉक्समध्ये लिहिले, “सुरुवातीला असे म्हटले जात होते की यावेळी सर्वजण टीव्ही कलाकार असतील.” दुसऱ्याने कमेंट केली, “हे काय आहे भाऊ.” एका व्यक्तीने लिहिले, “यावेळी खेळाडूंची नावे ऐकून मी निराश झालो आहे.” एका फॉलोअरने लिहिले, “भाऊ, सगळे म्हणत आहेत की शाहबाज 100% येत आहे, तुम्हाला काय वाटते.” शाहबाज हा प्रत्यक्षात बिग बॉसचा भाग राहिलेला स्पर्धक शहनाज गिलचा भाऊ आहे, ज्याचे शोमध्ये येणे त्याला किती मते मिळतील यावर अवलंबून असेल.
चाहते का नाराज?
त्यामुळे एकंदरीत जी यादी समोर येत आहे त्यातील फार कमी जण चाहत्यांच्या लिस्टमधील आहेत. बाकीच्यांची नावे जाणून चाहते एवढे खूश नसल्याचं दिसत आहे. त्यामुळे प्राचीचं नाव जाणून चाहत्यांना आनंद नक्कीच नाही झाला आहे. पण शो सुरु झाल्यानंतर हे स्पर्धक प्रेक्षकांचे मनोरंजन कसं करणार यावरूनही त्यांची लोकप्रियता ठरेल आणि चाहत्यांची मते बदलू शकतात.
