AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काहीच करायची इच्छा नाहीये… प्रसिद्ध अभिनेत्रीला त्याच गंभीर आजाराने परत घेरलं; पोस्ट शेअर करत मांडलं दु:ख… वेदना

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री देबिना बनर्जी सध्या एका गंभीर आजाराने त्रस्त झाली आहे. हा आजार बरा झाल्यानंतर परत होत असतो. तिला पुन्हा त्याच आजाराने घेरलं आहे. आता तिला ऑपरेशन करावं लागणार आहे. पण ऑपरेशन नंतरही तो आजार परत होऊ शकतो, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे देबिना अत्यंत वैतागली आहे. काहीच करायची इच्छा होत नसल्याचं ती म्हणत आहे.

काहीच करायची इच्छा नाहीये... प्रसिद्ध अभिनेत्रीला त्याच गंभीर आजाराने परत घेरलं; पोस्ट शेअर करत मांडलं दु:ख... वेदना
Debina BonnerjeeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 26, 2024 | 8:50 PM
Share

सीतेची व्यक्तिरेखा साकारून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री देबिना बनर्जीने तिच्या व्यक्तिगत दु:खांबाबतचा मोठा खुलासा केला आहे. देबिनाने तिला एंडोमेट्रियोसिस हा आजार झाल्याचं सांगितलंय. या आजारामुळे प्रचंड वेदना होत आहेत. या वेदनांमुळे माझं जगणं मुश्किल झालंय, असं देबिनाने म्हटलंय. देबिनाला दोन मुली आहेत. तिने ब्लॉगवर तिने या वेदनेला वाट मोकळी करून दिली आहे. लियानाच्या जन्मापूर्वीच या आजाराची कशी माहिती मिळाली आणि आता हा आजार पुन्हा कसा बळावला याची माहिती तिने पोस्ट शेअर करून दिली आहे.

देबिनाने तिच्या इन्स्टाग्रामवर फॅन्सशी बोलताना ही माहिती दिली आहे. मला काहीच करायची इच्छा होत नाहीये. मला बरं वाटत नाहीये. मी अस्वस्थ आहे. एंडोमेट्रियोसिस हा असा आजार आहे की जो कधीच तुमचा पिच्छा सोडत नाही. एक छोटसं ऑपरेशन आहे. ते करावं लागणार आहे. त्या ऑपरेशननंतर काही काळासाठी बरं वाटेल. पण हा आजार त्यानंतरही परत येतो. मी सध्या कोणतंच औषध घेत नाहीये. मी कधीच कोणीही वेदना दूर करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी औषधे घेत नाही, असं देबिनाने म्हटलंय.

त्या वेदना जाणवतच नव्हत्या

पीरियड्सच्या काळात वेदना होणं नॉर्मल आहे. मला हे माहीत नव्हतं. कारण युवा अवस्थेत मला पीरियड्सच्या काळात कधीच वेदना झाल्या नव्हत्या. जेव्हा मी इतरांकडून ऐकायचे तेव्हा वाटायचं बरं झालं मला काही वेदना होत नाहीत. लियानाच्या जन्माच्या काही वर्ष आधी मला पीरियड्सच्या काळा वेदना होऊ लागल्या. त्यावेळी मला एंडोमेट्रियोसिस आणि एडेनोमायोसिस आजार असल्याचं समजलं. हे आजार गर्भाशयात होतात, असंही तिने सांगितलं.

डॉक्टर काय म्हणाले?

डॉक्टरांनी मला ग्रेड 4 एंडोमेट्रियोसिस आणि एडेनोमायोसिस असल्याचं सांगितलं. त्या वेदना परत होत आहेत. मी गेल्या दोन तीन महिन्यापासून या वेदना सहन करत आहे. प्रचंड वेदना होत आहेत. हे खूप भयानक आहे. मी घरात राहूनही आराम करू शकत नाही. कारण मला सतत त्या वेदनांची जाणीव होतेय, असं ती म्हणते.

मंदिरात लग्न

2009मध्ये देबिना आणि गुरमीत यांनी एका मंदिरात लग्न केलं होतं. या दोघांनीही लग्नाची माहिती कुटुंबापासून दोन वर्ष लपवून ठेवली होती. 2011मध्ये दोघांनीही आपआपल्या कुटुंबाशी या विषयावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी धुमधडाक्यात पुन्हा एकदा लग्न केलं होतं.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.