Majhi Tujhi Reshimgath | खरंच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिकेतून एक्झिट घेणार? पाहा नेमकं काय झालं…

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील संकर्षण सकारात असलेल ‘समीर’ हे पात्र फार गाजते आहे. असे असताना अभिनेता ही मालिका सोडणार असल्याचे कानी पडताच अनेक चाहत्यांना धक्का बसला होता.

Majhi Tujhi Reshimgath | खरंच अभिनेता संकर्षण कऱ्हाडे मालिकेतून एक्झिट घेणार? पाहा नेमकं काय झालं...
Shreayas-Sankarshan
Follow us
| Updated on: Oct 18, 2021 | 3:10 PM

मुंबई : झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवर आता प्रेक्षकांना मनोरंजनाची नवी मेजवानी मिळत आहे. 5 नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. या मालिकांपैकीच एक म्हणजे “माझी तुझी रेशीमगाठ” (Majhi Tujhi Reshimgath). या मालिकेतून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (Prarthana Behere) आणि अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तब्बल दहा वर्षानंतर प्रार्थना बेहेरे छोट्या पडद्यावर पुरागमन केले आहे. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) देखील या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारतो आहे.

मात्र, आता संकर्षण या मालिकेतून एक्झिट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. अर्थात संकर्षण ही मालिका सोडत असल्याचे वृत्त सध्या जोर धरते आहे. पण, संकर्षण ही मालिका सोडणार नसून यातून काही काळाचा ब्रेक घेणार आहे.

काय आहे ब्रेकचे कारण?

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील संकर्षण सकारात असलेल ‘समीर’ हे पात्र फार गाजते आहे. असे असताना अभिनेता ही मालिका सोडणार असल्याचे कानी पडताच अनेक चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र, अभिनेता काहीकाळ ब्रेक घेत असल्याचे कळल्यावर हायसे वाटले आहे. खरंतर सध्या कोरोना विषाणूवर काही अंशी विजय मिळवल्यानंतर अनलॉकचं बिगुल वाजलं आहे.

तब्बल दोन वर्षानंतर नाट्यगृह खुली होणार आहेत. याच निमित्ताने प्रेक्षकांना पुन्हा नाटकं पाहायला मिळणार आहेत. यामध्येच संकर्षण अभिनित ‘तू म्हणशील तसं’ हे नाटक रंगभूमीवर प्रेक्षकांची वाहवा मिळवत होतं. आता हेच नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नाटकांचे प्रयोग सुरु होणार असल्याने संकर्षणला मालिकेसाठी वेळ देता येणार नाहीये. म्हणूनच तो काही काळासाठी अर्थात नाटकांच्या प्रयोगासाठी मालिकेतून ब्रेक घेणार असल्याचे कळते आहे.

संकर्षणची कारकीर्द

आपल्या अभिनय प्रतिभेने अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने अवघ्या परभणीचे मान गर्वाने उंच केली आहे. संकर्षण कऱ्हाडे हा केवळ अभिनेताच नाही तर, तो एक उत्तम लेखक आणि संवेदनशील कवी देखील आहे. संकर्षणने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट, नाटक, रिअ‍ॅलिटी शो अभिनय करण्याबरोबरच त्यांच्यासाठी लेखन देखील केले आहे.  चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संकर्षणने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. 2008च्या ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या कार्यक्रमामधून संकर्षणने मनोरंजन विश्वात पदार्पण केले. ‘माझीया प्रियाला प्रीत कळेना’, ‘आभास हा’, ‘मला सासू हवी’ अशा अनेक मालिकांमध्ये त्याने काम केलंय. याचबरोबर त्याने अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनाची धुरा देखील यशस्वीरित्या सांभाळली आहे.

पायाला दुखापत होऊनही अभिनेता रंगमंचावर हजर होतो!

काही महिन्यांपूर्वी संकर्षणच्या ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाचे 100 प्रयोग पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने त्याने सोशल मीडियाद्वारे चाह्त्यांसोबत एक खास आठवण प्रेक्षकांसोबत शेअर केली होती. अगदी वर्षभरापूर्वी घडून गेलेली एक घटना त्याने या खास निमित्ताने शेअर केली होती. संकर्षणनं शेअर केलेली ही आठवण होती ‘तू म्हणशील तसं…’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान झालेल्या पायाच्या दुखापतीची! ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अभिनेता संकर्षणच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तसाच, दुखापतग्रस्त पाय घेऊन त्याने आपल्या नाटकाचा संपूर्ण प्रयोग पूर्ण केला होता. एक वर्षापूर्वीची ही आठवण संकर्षणने 100च्या खास निमित्ताने सोशल मीडियावर शेअर केली होती.

हेही वाचा :

‘हे एक बाईच कसं बोलू शकते”,  ‘पदर नीट घेतला असतास तर…’ म्हणणाऱ्या चाहतीला हेमांगी कवीने सुनावले खडे बोल!

Morning Workout | समंथा बॅक टू रुटीन! सोशल मीडियावर शेअर केला वर्कआऊट व्हिडीओ, फिटनेस पाहून चाहतेही अवाक्!

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.