अभिनेता सुयश टिळकचा चाहत्यांना सुखद धक्का, ‘या’ अभिनेत्रीसह साखरपुडा

"आमचा साखरपुडा झाला असल्याची घोषणा करताना मला अत्यानंद होत आहे. प्रियजनांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांसह आम्ही आमचा एकत्र प्रवास सुरु करतोय. कुटुंबीय आणि मित्रांचे हा दिवस खास करण्यासाठी आभार" असंही त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे.

अभिनेता सुयश टिळकचा चाहत्यांना सुखद धक्का, 'या' अभिनेत्रीसह साखरपुडा
अभिनेता सुयश टिळक-अभिनेत्री आयुषी भावे यांचा साखरपुडा

मुंबई : का रे दुरावा, शुभमंगल ऑनलाईन यासारख्या मालिकांमधून लोकप्रिय झालेला अभिनेता सुयश टिळकने (Actor Suyash Tilak) चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सुयशने नुकताच गर्लफ्रेण्डसोबत साखरपुडा केला. अभिनेत्री आयुषी भावेसोबत (Ayushi Bhave) साखरपुडा झाल्याची घोषणा सुयशने केली. या घोषणेला निमित्त आहे आयुषीचा वाढदिवस. (Marathi TV Actor Suyash Tilak engagement with Girlfriend Actress Ayushi Bhave)

सुयश टिळकची इन्स्टाग्राम पोस्ट

“माझ्या आयुष्यातील सर्व गोष्टी सुंदर करणारी स्त्री.. हॅपी बर्थडे लव्ह… तुझ्यासोबत माझं आयुष्य परिपूर्ण होतं. तुझ्यासारखी उत्तम जोडीदार मिळाल्याने मी अत्यंत भाग्यवान ठरलो आहे” अशा भावना सुयशने आयुषीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केल्या आहेत.

“आमचा साखरपुडा झाला असल्याची घोषणा करताना मला अत्यानंद होत आहे. प्रियजनांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांसह आम्ही आमचा एकत्र प्रवास सुरु करतोय. कुटुंबीय आणि मित्रांचे हा दिवस खास करण्यासाठी आभार” असंही त्याने इन्स्टाग्रामवर लिहिलं आहे. सुयशने आयुषीसोबत साखरपुड्यातील फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

आयुषीकडूनही चाहत्यांना खुशखबर

सुयशसोबतच आयुषीनेही साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. तो हॅपी बर्थडे म्हणाला, मी होकार दिला, असं कॅप्शन तिने दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by A a y u s h i (@aayushibhave)

सुयशवर चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील त्याचे मित्र, कलाकारांनीही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील त्याची सहकलाकार सायली संजीव, अभिनेत्री हर्षदा खानविलकर, शर्मिला शिंदे यांनीही इन्स्टाग्रामवर शुभेच्छा दिल्या आहेत.

कोण आहे आयुषी भावे?

आयुषी भावे ही 2018 मध्ये महाराष्ट्राची श्रावणक्वीन किताबाची मानकरी ठरली होती. त्यानंतर तिने मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं युवा डान्सिंग क्विन या टीव्ही शोमध्ये आयुषी सहभागी झाली होती. आयुषी भावे लवकरच एका सिनेमातही झळकणार आहे.

सुयश टिळकची कारकीर्द

34 वर्षीय सुयश टिळकने 2010 मध्ये मनोरंजन विश्वात एन्ट्री घेतली. अमरप्रेम, बंध रेशमाचे, दुर्वा, पुढचं पाऊल यासारख्या मालिकांमध्ये त्याने सहाय्यक भूमिका केल्या. 2014 मध्ये का रे दुरावा मालिकेतील जयच्या भूमिकेमुळे सुयशला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर सख्या रे, बापमाणूस, छोटी मालकीण, एक घर मंतरलेलं यासारख्या मालिका त्याने केल्या. सध्या तो शुभमंगल ऑनलाईन मालिकेत दिसतो.

‘भाकरखाडी 7 किमी’, ‘क्लासमेट’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘तिचा उंबरठा’, ‘ दिवस हा माझा’ आणि बॉलिवूडमधील ‘खाली पिली’ या चित्रपटांमधून सुयशचा चांगला फॅनफॉलोईंग तयार झालाय. तर शॉक कथा, बूमरँग या वेब सीरीजमधील त्याच्या भूमिकाही गाजल्या आहेत.

सोशल मीडियाला ‘रामराम’ मात्र परत एंट्री

अभिनेता सुयश टिळक हा नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट होत असतो. मात्र अचानक सुयशनं सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला होता. इन्स्टाग्रामवर खलील जिब्रानचं एक कोट पोस्ट करत सुयशनं हा निर्णय चाहत्यांना सांगितला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. मात्र आता सुयशनं सोशल मीडियावर आता परत एंट्री केली.

संबंधित बातम्या :

Suyash Tilak : उत्तम अभिनेता, अप्रतिम फोटोग्राफर ते सोशल मीडियाला गुडबाय; वाचा ‘सुयश’ टिळकची कहाणी!

(Marathi TV Actor Suyash Tilak engagement with Girlfriend Actress Ayushi Bhave)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI