Sheezan Khan | तुनिशा शर्मा हिच्या आठवणीमध्ये शीजान खान झाला भावूक, पोस्ट शेअर करत अभिनेता म्हणाला
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. तुनिशा शर्मा हिच्या आईने शीजान खान याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात बरेच दिवस जेलमध्ये राहण्याची वेळ ही शीजान खान याच्यावर आली होती. सध्या शीजान खान हा चर्चेत आहे.

मुंबई : तुनिषा शर्मा हिने अली बाबा मालिकेच्या सेटवर आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपली. तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिच्या आत्महत्येनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. अली बाबा मालिकेमध्ये तुनिशा शर्मा हिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर तुनिशाच्या आईने काही गंभीर आरोप केले. पोलिसांनी शीजान खान (Sheezan Khan) याला अटकही केली. जवळपास अडीच महिने शीजान खान हा जेलमध्ये होता. तुनिशा शर्मा हिने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली. तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, आत्महत्येच्या 15 दिवस अगोदरच शीजान आणि तुनिशाचे ब्रेकअप झाले होते.
तुनिशा शर्मा हिच्या आईने लेकीच्या आत्महत्येला शीजान खान हाच दोषी असल्याचे म्हटले. कारण शीजान खान हा तुनिशा शर्मा हिला धोका देत असल्याचे तिने म्हटले. शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्याने तुनिशा ही तणावात होती आणि तिने थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. तुनिशा शर्मा हिच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान खान याच्या कुटुंबियांनीही मोठे खुलासे केले.

शीजान खान हा जेलमधून बाहेर आल्यापासून सतत शायरी सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. शीजान खान हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय देखील दिसतोय. शीजान खान याने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केलीये. शीजान खान याने लिहिले की, जो दूर है नजर से उस चांद को भी चांद मुबारक…आता शीजान खान याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.
शीजान खान याने अली बाबा मालिकेच्या सेटवरीलही काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुनिशा शर्मा ही देखील दिसत आहे. फोटोमध्ये तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे खूप जास्त आनंदामध्ये दिसत असून एकमेकांकडे बघून हसताना दिसत आहेत. या पोस्टवरून हे स्पष्ट दिसत आहे की, शीजान खान हा तुनिशा शर्मा हिला खूप जास्त मिस करत आहे.
View this post on Instagram
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खानवर आयपीसी कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली होती. बरेच दिवस शीजान खान याला कोर्टाकडून दिला मिळत नव्हता. शेवटी 4 मार्च रोजी शीजान खान याला दिलासा मिळाला. शीजान खान याला जेलमधून बाहेर पडताना पाहून त्याची आईही ढसाढसा रडताना दिसली होती. तुनिशा शर्मा हिच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बहिणीने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली होती.
