Indian Idol 12 | ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर काढण्याची मागणी, षण्मुखप्रियाच्या समर्थनात उतरली दाक्षिणात्य इंडस्ट्री!

सोनी टीव्हीवरील सोनी रिअॅलिटी शो 'इंडियन आयडल 12' च्या (Indian Idol 12) दर्शकांकडून स्पर्धक-गायिक षण्मुखप्रिया (Shanmukh Priya) गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोल होत आहेत. दरम्यान, आता षण्मुखप्रियाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सहकार्य लाभले आहे.

Indian Idol 12 | ‘इंडियन आयडॉल 12’मधून बाहेर काढण्याची मागणी, षण्मुखप्रियाच्या समर्थनात उतरली दाक्षिणात्य इंडस्ट्री!
षण्मुख प्रिया

मुंबई : सोनी टीव्हीवरील सोनी रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल 12’ च्या (Indian Idol 12) दर्शकांकडून स्पर्धक-गायिक षण्मुखप्रिया (Shanmukh Priya) गेल्या काही दिवसांपासून सतत ट्रोल होत आहेत. दरम्यान, आता षण्मुखप्रियाला साऊथ फिल्म इंडस्ट्रीचे सहकार्य लाभले आहे. काल रात्री ‘सिमा’ अर्थात दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या वतीने एक ट्विट केले गेले. या ट्विटमध्ये षण्मुखप्रिया हिला SIIMAने पूर्ण पाठिंबा दर्शवला होता (SIIMA supports Indian Idol 12 contestant Shanmukh priya).

SIIMA ने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “विशाखापट्टणममधील षण्मुखप्रिया ही एक अशी प्रतिभा आहे, जी यावर्षीच्या इंडियन आयडॉलमधील सेन्शेशनपेक्षा कमी नाही”. दुसर्‍या ट्वीटमध्ये, सीआयएमएने लिहिले की, “18 वर्षांची ही मुलगी तिच्या शानदार गायनामुळे परीक्षक आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यास सक्षम आहे. म्हणूनच, या हंगामात आयडॉल 12 स्पर्धेच्या शर्यतीमध्ये संभाव्य विजेती म्हणून षण्मुखप्रियाचे नाव पुढे येत आहे. चला तर तिचे समर्थन करूया, कारण ती आपल्या आवाजाच्या वादळाने संगीताच्या जगात पाऊल ठेवण्यास तयार आहे.”

साऊथ फिल्म इंडस्ट्रीकडून पूर्ण पाठिंबा

किशोर कुमार स्पेशल एपिसोडपासून इंडियन आयडॉलचे चाहते षण्मुखप्रियाला बरेच ट्रोल करत आहेत. तरीही, ही 18 वर्षांची इंडियन आयडॉल 12ची स्पर्धक टीकांकडे दुर्लक्ष करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत दक्षिण उद्योगाने षण्मुखप्रिया हिला दिलेला हा पाठिंबा निश्चितच तिचे मनोबल वाढवण्यात मदत करेल.

एसआयआयएमए (SIIMA) ही दक्षिणची एक मोठी संस्था आहे, ज्यांचे पुरस्कार तेलुगू, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि संपूर्ण दक्षिण भारतीय सिनेमाचे प्रतिनिधित्व करतात (SIIMA supports Indian Idol 12 contestant Shanmukh priya).

षण्मुखप्रियाला स्पर्धेतून वगळण्याची मागणी

जरी षण्मुखप्रियाला साऊथ इंडस्ट्रीकडून पाठिंबा मिळत आहे, पण तरीदेखील तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी देखील सातत्याने वाढत आहे. अलीकडेच तिने एक मुलाखत दिली होती, ज्यात तिने म्हटले होते की, मायकेल जॅक्सनला देखील अशा प्रकारे लोकांच्या टीका ऐकाव्या लागल्या होत्या.

मायकल जॅक्सनची स्वतःशी तुलना करत, षण्मुखप्रियाने ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले होते. यावर एका चाहत्याने लिहिले की, मायकल जॅक्सन एक महान गायक होते, जर आपण आपल्या गायनाची तुलना त्यांच्या नाही कराल, तर तेच चांगले ठरेल.

(SIIMA supports Indian Idol 12 contestant Shanmukh priya)

हेही वाचा :

Friends: The Reunion | भारतात ‘फ्रेंड्स : द रियुनियन’चा नवा विक्रम, अवघ्या 9 तासांत मिळवले ‘इतके’ व्ह्यूज

Devmanus | लगीनघाईच्या नादात ‘देवमाणूस’ फसणार, ACP दिव्या ‘देवी सिंग’ला अखेर अटक करणार!

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI