‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (TMKOC) ही मालिका गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. छोट्या पडद्यावरील ही सर्वांत लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. यातील जेठालाल, बबिता, दयाबेन, टप्पू, तारक मेहता या भूमिका प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचल्या आहेत. या मालिकेत जेठालालची पत्नी दयाबेनची (Dayaben) भूमिका अभिनेत्री दिशा वकानीने (Disha Vakani) साकारली. 2008 ते 2017 पर्यंत दिशा या मालिकेत काम करत होती. मात्र बाळंतपणासाठी तिने मालिकेतून ब्रेक घेतला आणि पुन्हा ती परतलीच नाही.