Tu Tevha Tashi: अखेर अनामिका देणार प्रेमाची कबुली? मालिका रंजक वळणावर

नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की अनामिकाचा अबोला पाहून सौरभ शहर सोडण्याचा निर्णय घेतो पण हे अनामिकाला माहित नाही आहे. प्रेक्षकांना मालिकेत आता पुढे पाहायला मिळेल की बाहेरगावी गेलेली वल्ली मुद्दम सौरभच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येते आणि अनामिकाला घेऊन येते या बोलीवर ती अनामिकाकडे जाते.

Tu Tevha Tashi: अखेर अनामिका देणार प्रेमाची कबुली? मालिका रंजक वळणावर
Tu Tevha Tashi
Image Credit source: Tv9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 28, 2022 | 2:46 PM

‘तू तेव्हा तशी’ (Tu Tevha Tashi) या मालिकेला प्रेक्षकांनी सुरुवातीपासून पसंती दर्शवली. या मालिकेतील पट्या (Swwapnil Joshi) आणि अनामिकाची (Shilpa Tulaskar) अव्यक्त प्रेम कथा प्रेक्षकांना भलतीच आवडली. नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की अनामिकाचा अबोला पाहून सौरभ शहर सोडण्याचा निर्णय घेतो पण हे अनामिकाला माहित नाही आहे. प्रेक्षकांना मालिकेत आता पुढे पाहायला मिळेल की बाहेरगावी गेलेली वल्ली मुद्दम सौरभच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी येते आणि अनामिकाला घेऊन येते या बोलीवर ती अनामिकाकडे जाते. पण इकडे सौरभचा निर्णय पक्का आहे. तो बेंगळुरूला निघाला आहे. वल्ली अनामिकाला सगळं सांगते आणि अनामिका सौरभला थांबवायला निघते. पण वल्लीने अनामिकाला मुद्दाम चुकीचा पत्ता देते. अनामिका तिथे पोहोचू नये यासाठी वल्ली अनेक प्रयत्न करते पण अखेर अनामिका तिथे पोहोचते. आता अनामिका सौरभला गाठू शकेल का? तिच्या प्रेमाची कबुली देईल का? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेत पाहायला मिळेल.

याआधी प्रेक्षकांनी पाहिलं की मालिकेत सौरभ अनामिकाकडे त्याच्या प्रेमाची कबुली देतो पण अनामिकाला मात्र हे मान्य नाही आहे. इतकंच काय तर सौरभ आणि अनामिकाच्या आईची एका चुकीच्या वेळी भेट होते आणि सौरभच त्याच्या आईवर चुकीचं इम्प्रेशन पडतं. त्यातच वल्ली जाऊन अनामिकाच्या आईचे कान भरते. त्यामुळे सौरभ आणि अनामिकाची ताटातूट होणार का असा प्रश्न निर्माण होतो.

पहा व्हिडीओ-

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

20 मार्चपासून रात्री 8 वाजता झी मराठी वाहिनीवर ही मालिका प्रसारित होत आहे. अभिनेता स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. स्वप्नील यात सौरभ तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारत आहे. या दोघांसोबत छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावेसुद्धा यामध्ये भूमिका साकारतेय.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें