बिग बॉसच्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं… कोण पडतंय परदेसी गर्लच्या प्रेमात?

Vaibhav Chavan and Irina Rudakova Chemistry : बिग मराठीच्या घरात प्रेमाचं वारं वाहू लागलं आहे. बारामतीचा रांगडा गडी वैभव चव्हाण पडलाय परदेसी गर्ल इरिनाच्या प्रेमात? बिग मराठीच्या घरातील एक व्हीडिओ समोर आलाय. त्या व्हीडिओंमुळे चर्चांना उधाण आलं आहे. वाचा....

बिग बॉसच्या घरात वाहू लागलंय प्रेमाचं वारं... कोण पडतंय परदेसी गर्लच्या प्रेमात?
कोण पडलं इरिनाच्या प्रेमात?Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Aug 06, 2024 | 7:40 PM

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच घरात प्रेमाचे वारे वाहू लागले आहेत. निक्की तांबोळी आणि अरबाज पटेलचा बॉन्ड नेटकऱ्यांच्या आणि ‘बिग बॉस’ प्रेमींच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे. अशातच आता आणखी एक प्रेमकहाणी फुलू शकते. रांगड्या मातीत परदेसी प्रेमाचं रोपटं फुलताना दिसून येणार आहे. ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाचं वारंवार कौतुक करताना आणि तिला जास्त महत्त्व देताना दिसून येत आहे. या प्रोमोमुळे वैभव आणि इरिना प्रेमात पडत असल्याची चर्चा होत आहे.

बिग बॉसच्या घरात वाहतंय प्रेमाचं वारं?

‘बिग बॉस मराठी’ चा नवा प्रोमो समोर आला आहे. यात वैभव आणि इरिना यांची केमेस्ट्री पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये वैभव चव्हाण इरिनाला म्हणतोय, ‘कालपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. मला तू जास्त महत्त्वाची व्यक्ती असल्याचं फिल होतंय’. त्यावर इरिना ‘हो’ असं उत्तर देते. तर दुसरीकडे जान्हवी वैभवला ‘फॉरेनची पाटलीन मस्त आहे’, असं म्हणते. हे सगळं पाहिल्यावर त्यावर निक्की बोलते. ‘भाई… तुझं काय चाललंय, असं निक्की म्हणते.

नवी जोडी पाहायला मिळणार?

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या केमेस्ट्रीची चर्चा असतानाच आता वैभव आणि इरिना यांची जोडी जुळताना दिसतेय. बारामतीचा रांगडा गडी अभिनेता वैभव चव्हाण आणि परदेसी गर्ल इरिना रूडाकोवा यांच्यात खरंच प्रेम फुलतंय? की नाटक आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना पुढचा एपिसोड पाहावा लागणार आहे. या दोघांचं प्रेम बहरतं का? हे पाहावं लागणार आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या घरात आज पहिला कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. ‘कॅप्टनसीची बुलेट ट्रेन’ असं या कॅप्टनसी कार्याचं नाव आहे. या टास्कदरम्यान घरात सूरज आणि वैभवमध्ये दोरदार भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. ‘दम असेल तर मला हात लावून दाखव’, असं वैभव सूरजला म्हणतो. पण इरिना मात्र सूरजला शांत करते.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.