Happy Birthday Mummyji : शेफाली शाहच्या दिग्दर्शनात तयार होणार दूसरा लघुपट, ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’ची धमाकेदार सुरुवात!

शेफाली 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी'च्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहानी सामील आहे. (The second short film to be made under the direction of Shefali Shah, 'Happy Birthday Mummyji' has got amazing start!)

Happy Birthday Mummyji : शेफाली शाहच्या दिग्दर्शनात तयार होणार दूसरा लघुपट, 'हॅप्पी बर्थडे मम्मीजी'ची धमाकेदार सुरुवात!

मुंबई : प्रतिभाशाली अभिनेत्री शेफाली शाह (Actress Shefali Shah) आपला दूसरा दिग्दर्शित लघुपट (Short Film) ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी‘ (Happy Birthday Mummyji) सोबत आपल्याला मंत्रमुग्ध करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा लघुपट शेफालीद्वारे लिखीत आहे. ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चे कथानक हा एका महिलेचा भावनात्मक प्रवास आहे, ज्यासोबत प्रत्येक महिला स्वतःला जोडून घेऊ शकते.

शेफाली ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’च्या निमित्ताने, एक अशी कथा पडद्यावर आणणार आहे ज्यामध्ये समान परिस्थितीतून जाणाऱ्या हजारों महिलांची कहानी सामील आहे. शेफालीद्वारे दिग्दर्शित या लघुपटाचं चित्रीकरण मुंबईत करण्यात आलं आहे. ‘समडे’नंतर शेफाली दिग्दर्शित हा दूसरा लघुपट आहे. दशकांहून अधिक काळ गाजवणारी एक यशस्वी अभिनेत्री, शेफालीने पुन्हा एकदा आपल्याला आपल्या ‘अजीब दास्तान्स’मधून आपले अभिनय कौशल्य दाखवले होते. लवकरच ती आलिया भट्ट आणि विजय वर्मासोबत डार्लिंग्स या चित्रपटामध्ये दिसणार आहे.

इन्स्टाग्राम पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Shefali Shah (@shefalishahofficial)

लघुपटाबाबत बोलताना अभिनेत्री आणि दिग्दर्शिका शेफाली शाह म्हणाली की, “हा लघुपट म्हणजे आपल्यामधल्या सर्वांचीची गोष्ट आहे, जे आपलं नातं, कुटुंब, घरामुळं ओळखलं जात असतात. एक असा विकल्प जो आपण आनंदाने निवडतो. मात्र, आपण सर्वांनीच हे अनुभवले असेल की कधी कधी या सर्व जबाबदाऱ्या सोडून देण्याची गरज निर्माण होते. कोरोनाच्या संकटामुळे झालेल्या लॉकडाउननं आपल्यावर सर्वांपासून वेगळं पडण्याची प्रबळ भावना निर्माण केली, मात्र काय झालं असते जर यावर एखादी वेगळी विचारधारा लागू करता आली असती.”

संबंधित बातम्या

Surekha Sikri : तीन वेळा नॅशनल अवॉर्ड तरीही स्टारडम नाही, ‘बालिका वधु’ने दिलं ग्लॅमर, वाचा अभिनेत्री सुरेखा सिक्रींचा फिल्मी प्रवास

Aai Kuthe Kay Karte | अरुंधतीच्या घरात अनिरुद्धच्या भावाची एंट्री, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार अविनाश देशमुख!

Rahul Disha Wedding : विवाह बंधनात अडकले दिशा परमार-राहुल वैद्य, पाहा लग्नसोहळ्याचे काही खास क्षण…

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI