AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Surekha Sikri : तीन वेळा नॅशनल अवॉर्ड तरीही स्टारडम नाही, ‘बालिका वधु’ने दिलं ग्लॅमर, वाचा अभिनेत्री सुरेखा सिक्रींचा फिल्मी प्रवास

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे मुंबईत निधन झाले. (Three times National Award, 'Balika Vadhu' gives her glamor, read Actress Surekha Sikri's film journey)

| Edited By: | Updated on: Jul 16, 2021 | 5:15 PM
Share
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री सुरेखा सिक्री (Surekha Sikri) यांचे मुंबईत निधन झाले. अभिनेत्री बर्‍याच दिवसांपासून आजारी होत्या. 2020मध्ये सुरेखा ब्रेन स्ट्रोक आला होता. रिपोर्ट्सनुसार, आज सकाळी हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या ब्रेन स्ट्रोकमुळे त्यांच्या आरोग्यातील गुंतागुंत वाढली होती.

1 / 7
सुरेखा सिक्री यांना 2019 मध्ये ‘बधाई हो’ या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. चित्रपटांमधील तिच्या सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी सुरेखा सिक्री यांना यापूर्वी नोव्हेंबर 2018मध्ये देखील ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यादरम्यान अभिनेत्रीला अर्धांगवायू झाला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शूटिंगदरम्यान त्या खाली कोसळून पडली होती, त्यानंतर अभिनेत्रीची तब्येत हळूहळू सुधारत होती. मात्र, तरीही त्या जागीच अंथरुणाला खिळल्या होत्या.

2 / 7
थिएटर, सिनेमा आणि नंतर छोट्या पडद्यावर खोलवर छाप पाडणारी सुरेखा सिक्री चाहत्यांच्या लाडक्या अभिनेत्री होत्या. चित्रपटांमध्ये दमदार कामगिरी केल्यावर सुरेखा यांना कलर्सची सीरियल ‘बालिका वधू’मधून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. या शोमधील ‘दादी सा’च्या व्यक्तिरेखेने तिला उंचीवर नेले होते.

3 / 7
दिल्ली शहरात जन्मलेल्या सुरेखा सिक्री लहानपणापासूनच आपल्या अभ्यासामध्ये उत्तम होत्या. सुरेखा यांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातून आपले शिक्षण घेतलं आहे. अभ्यासादरम्यान अभिनय करण्याची त्यांची आवड पाहून त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर त्या सतत थिएटरमध्ये सक्रिय होत्या. दहा वर्ष एनएसडी रेपरेटरी कंपनीशी जोडलेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचा विचार केला. त्यानंतर सुरेखा दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाल्या. जिथे त्यांना किस्सा कुर्सी का मध्ये पहिला ब्रेक आला.

4 / 7
मुंबईत आल्यानंतर सुरेखा यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. त्यानंतर सुरेखा अनेक हिंदी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये सहाय्यक भूमिका साकारत आल्या. सोबतच त्या मालिकांमध्ये सक्रिय होत्याच. त्यांच्या अभिनय कारकीर्दीत त्यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत.

5 / 7
सुरेखा सिक्री यांनी 1978 मध्ये मीराच्या रूपात किस्सा कुर्सी का या चित्रपटातून प्रवेश केला होता. यानंतर त्यांनी तमस, परिणीती, नजर लिटल बुढा, सरदारी बेगम, सरफरोज, दिल्लगी, कॉटन मेरी, जुबैदा, देहम, काली सलवार अशा चित्रपटांत आपल्या अभिनयाची छाप सोडली. चित्रपटात येण्यापूर्वी सुरेखा यांना पत्रकार आणि लेखक होण्याची इच्छा होती. शाळेतसुद्धा सुरेखा अभ्यासामध्ये अव्वल होत्या.

6 / 7
इतकं काम केल्यानंतरही खुद्द सुरेखा यांना असा विश्वास होता की बालिका वधूच्या कल्याणी देवी उर्फ दादी सानं त्यांना घराघरात पोहोचवलं. त्याचबरोबर, गेले पाच वर्ष सुरेखा यांची चित्रपटात मागणी कायम राहिली. बधाई हो, शीर कुर्मा, घोष्ट स्टोरीजमध्ये त्यांनी आपली छोटी पण महत्वाची भूमिका साकारली.

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.