तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून देणार होते जीव पण…; विकीच्या वडिलांच्या आयुष्यातील कठीण काळ
अभिनेता विकी कौशलचे वडील हे अॅक्शन दिग्दर्शक आहेत. एक काळ असा आला होता की त्यांनी स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. नेमकं काय झालं होतं चला जाणून घेऊया...

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल हा कायमच चर्चेत असतो. अल्पावधीमध्ये तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये त्याचे नाव घेतले जाते. विकीचे वडील हे बॉलिवूडमधील एकेकाळचे अतिशय लोकप्रिय स्टंट आणि अॅक्शन कोरियोग्राफर होते. त्यांनी अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले आहे.दंगल, बाजीराव मस्तानी, पद्मावत, क्रिश ३ यांसारख्या जबरदस्त चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. पण त्यांच्या आयुष्यातील एक काळ असा होता की त्यांनी स्वत:ला संपवण्याचा विचार केला होता.
विकीच्या वडिलांनी कॅन्सरशी झुंज दिली आहे. त्यांची ही झुंज यशस्वी ठरली असली तरी तो काळ कठीण होता. याविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. पण या कठीण काळात त्यांनी हार मानली नाही. आत्महत्येचे विचार येत असतानाही त्यांनी मुलांकडे पाहिले आणि स्वत:ला समजावले. याविषयी बोलताना शाम कौशल एका मुलाखतीमध्ये म्हणाले, ‘मी 8 ऑगस्ट 1980 साली स्टंट आर्टिस्ट युनियनचा सदस्य झालो होता. त्यानंतर 8 ऑगस्ट 2022 रोजी मी या इंडस्ट्रीमध्ये 42 वर्षे पूर्ण केली आहेत. मी 1990 मध्ये ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. माझा पहिला चित्रपट मल्याळम होता. त्याचे नाव इंद्रजलम होते. अभिनेते नाना पाटेकर यांचा प्रहार हा माझा पहिला बॉलिवूड चित्रपट होता. मला माझा पहिला चित्रपट निशाबाने मिळाला.’
शाम यांची दोन्ही मुले विकी आणि सनी हे लहान असताना आयुष्यातील मोठी रिस्क घेतली होती. त्यांनी ॲक्शन डायरेक्टर व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी स्टंटमनचे सदस्यत्व सोडले. जर त्यांना अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम मिळाले नसते तर नक्कीच घरी बसावे लागले असते. हे माहिती असताना देखील त्यांनी मोठी रिस्क घेतली. ते अॅक्शन डायरेक्टर मेंबरशिपचे कार्ड घेऊन शुटिंगसाठी निघाले होते. लडाखहून सप्टेंबर २००३ मध्ये ‘लक्ष्य’चे शूटिंग पूर्ण करून परत आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखायला लागले होते. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.




श्याम बेनेगल यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले होते आणि दिवाळीची सुट्टी होती. त्यांच्या पुन्हा पोटात दुखायला लागले होते. त्यानंतर ते रुग्णालयात गेले आणि तापसणी केली. डॉक्टरांनी तातडीने पोटावर शस्त्रक्रिया केली. याआधी अपेंडिक्सच्या समस्येमुळे शाम हे नाना पाटेकरांसोबत नानावटी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे तेथील डॉक्टर शाम यांच्या ओळखीचे झाले होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी नानांना बोलावून घेतले. त्यांनी कॅन्सर झाल्याचे सांगितले. शाम हे ५० दिवस रुग्णालयात होते. सुदैवाने कॅन्सर पसरला नाही. त्या घटनेला १९ वर्षे झाली. एक वेळ अशी आली होती की शाम यांनी निर्धार केला होता की तिसर्या मजल्यावरून उडी मारून जीव द्यायचा. पण नंतर त्यांनी त्यांचा निर्णय बदलला.