New Innings | चाहत खन्नाचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, विजय माल्याच्या आयुष्यावर काढणार वेबसिरीज!

टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना नुकतीच मिका सिंगसोबत एका व्हिडिओमध्ये दिसली होती. आता चाहत निर्माता होण्याची तयारीत आहे.

New Innings | चाहत खन्नाचं निर्मिती क्षेत्रात पदार्पण, विजय माल्याच्या आयुष्यावर काढणार वेबसिरीज!

मुंबई : टीव्ही अभिनेत्री चाहत खन्ना (Chahatt Khanna) नुकतीच मिका सिंगसोबत (Mika Singh) एका व्हिडिओमध्ये दिसली होती. आता चाहत निर्माता होण्याची तयारीत आहे. चाहत लवकरच विजय मल्ल्यावर (Vijay Mallya) एक वेब सीरिज बनवणार आहे. जी गिरी प्रकाश यांच्या ‘द विजय मल्ल्या’ या पुस्तकाच्या कथेवर आधारित आहे. चाहतने या वेब सीरीजबद्दल बर्‍याच गोष्टी सांगितल्या आहेत. “विजय मल्ल्याची कथा खूप वेगळी आहे. (Web series based on Vijay Mallya coming soon)

 

View this post on Instagram

 

A post shared by CK (@chahattkhanna)

त्यामुळे मी ही वेब सीरीज तयार करण्याचा निर्णय घेतला आहे,” असं म्हणत चाहत पुढे म्हणाली की, लोकांना विजय मल्लाबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे.

चाहतला प्रश्न विचारण्यात आला की, या वेब सीरीजमध्ये विजय मल्लाची भूमिका कोण करणार आहे त्यावेळी चाहत म्हणाली की, खूप मोठे नाव या वेब सीरीजशी सोडले गेले आहे, मात्र, त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव मी तुम्हाला सांगू शकणार नाही. या वेब सीरीजमध्ये चाहत देखील काम करणार आहे. चाहत तिच्या डिजिटल पदार्पणा विषयी म्हणाली की, “डिजिटल हे चित्रपटांचे भविष्य आहे असे मला वाटते.

अलिकडच्या काळात ओटीटी प्लॅटफाॅर्म मनोरंजनाचे एक चांगले साधन झाले आहे. हे पाहता फिल्मफेयर ने ओटीटी कॉन्टेंटसाठी फ्लिक्स फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सुरू केले आहेत. या पुरस्काराच्या पहिल्यावेळीच पंचायत ते पाताळ लोक अशा लोकप्रिय वेब सीरिजने हंगामा केला आहे. या वेब सीरीजने अनेक पुरस्कार जिंकले आहेत.

संबंधित बातम्या : 

Posters | ‘तांडव’मध्ये राजकारणातले मोहरे आमनेसामने, डायलॉगने वाढवली उत्सुकता!

Aashram New Season | वादाच्या भोवऱ्यात अडकूनही ‘आश्रम’ सीरीज परत एकदा करणार धमाका?

(Web series based on Vijay Mallya coming soon)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI