‘इंडियाज गॉट लेटेंट’चा वाद काय? अश्लील टिप्पण्यांमुळे समय रैना, रणवीर अलाहबादियाला तुरुंगवास होणार?
'इंडियाज गॉट लेटेंट' हा शो काय आहे, समय रैना कोण आहे, त्यावरून सुरू असलेला वाद काय आहे, युट्यूबर रणवीर अलाहबादियाच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद कसे उमटले आहेत, याविषयीची माहिती या लेखातून जाणून घेऊयात..

कॉमेडियन समय रैना, युट्यूबर – पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया आणि ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शो.. ही नावं गेल्या काही दिवसांपासून तुमच्या कानांवर पडलीच असतील. सोशल मीडियावर या सर्वांची इतकी चर्चा आहे की प्रत्येकाला या शोबद्दल आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल जाणून घ्यायचं आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये स्पर्धक आणि परीक्षकांकडून होणाऱ्या अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे हा शो इतका चर्चेत आला आहे. मात्र याच अश्लील आणि आक्षेपार्ह टिप्पण्यांमुळे आता शोचा कर्ताधर्ता समय रैना आणि इतर परीक्षकांवर पोलीस चौकशीची वेळ आली आहे. हा वाद इतका वाढलाय की अखेर युट्यूबरील या शोचे सर्व एपिसोड काढून टाकण्यात आले आहेत. आतापर्यंत 50 जणांना महाराष्ट्र सायबर विभागाने समन्स बजावला आहे. त्यात परीक्षक आणि स्पर्धकांचाही समावेश आहे. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ हा शो काय आहे, समय रैना कोण आहे, त्यातील रणवीर अलाहबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरून कोणती कारवाई होऊ शकते, अशा शोजमधील अश्लील भाषेबद्दल कायदा काय म्हणतो, या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तरपणे जाणून घेऊयात.. ...