AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशा लोकांसाठी जागा नाही..; ‘ये रिश्ता..’चा वाद टोकाला, मुख्य कलाकारांना काढून टाकल्यानंतर निर्मात्यांची प्रतिक्रिया

स्टार प्लस वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’चा वाद टोकाला पोहोचला आहे. या मालिकेत अरमान पोद्दार आणि रुही बिर्ला या मुख्य भूमिका साकारणारे कलाकार शहजादा धामी आणि प्रतीश्रा होनमुखे यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

अशा लोकांसाठी जागा नाही..; 'ये रिश्ता..'चा वाद टोकाला, मुख्य कलाकारांना काढून टाकल्यानंतर निर्मात्यांची प्रतिक्रिया
'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील मुख्य कलाकारांची एग्झिटImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2024 | 10:01 AM
Share

मुंबई : 20 मार्च 2024 | स्टार प्लस वाहिनीवरील सर्वांत लोकप्रिय मालिका ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या दोन कलाकारांना तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता मालिकेत नवीन कलाकार दिसणार आहेत. ‘ये रिश्ता..’मध्ये अरमान आणि रुहीची भूमिका साकारणाऱ्या शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या दोघांना अचानक मालिकेतून काढून टाकल्याने चाहतेसुद्धा चकीत झाले आहेत. यावर आता निर्माते राजन शाही यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, “कलाकारांसोबत माझे अनेकदा वाद होतात. मात्र शोपेक्षा अधिक महत्त्वाचं कोणीच नाही, निर्माताही नाही. मी माझ्या मालिकेतील कलाकारांच्या कामाचं नेहमीच कौतुक करतो. मात्र अनेकजण असा चुकीचा दावा करतात की त्यांना 18 तास शूटिंग करावी लागते. असं दररोज घडत नाही, कधीतरी त्यांना अधिक तास थांबून काम करावं लागतं. प्रेक्षक त्यांच्या लाडक्या कलाकारांबद्दल असा विचार करतात की ते सतत कामच करत असतात. मात्र याबाबतीत मी नेहमीच स्पष्ट केलंय. मी असा एकमेव निर्माता असेन जो त्याच्या कलाकारांच्या मेहनतीचं कौतुक करायला सर्वांत आघाडीवर असेल. पण माझ्यासोबत जर कोणी वाईट वागत असेल किंवा मला त्रास दिला जात असेल तर मी ते सहन करणार नाही.”

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नुकतीच जनरेशन लीप दाखवण्यात आली होती. त्यानंतर मुख्य भूमिकांसाठी शहजादा आणि प्रतीक्षा यांची निवड करण्यात आली होती. मात्र शहजादा धामी आणि प्रतीक्षा होनमुखे हे दोघं एकमेकांना डेट करू लागले होते. या दोघांमधील जवळीक वाढली होती आणि त्याचा परिणाम मालिकेच्या कामावर होऊ लागला होता. सेटवरील त्यांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे आधी क्रिएटीव्ह टीमशी वाद झाला. नंतर हा मुद्दा थेट प्रॉडक्शन हाऊसपर्यंत पोहोचला. दोघांच्या अनप्रोफेशनल वागणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतंय.

या मालिकेत आता गर्विता सधवानी रुहीची भूमिका साकारणार आहे. तर रोहित पुरोहितने शहजादाची जागा घेतली आहे. गर्विताने याआधी ‘बातें कुछ अनकहीं सी’ या मालिकेत मृणालची भूमिका साकारली होती. तर श्वेता तिवारीच्या ‘मैं हूँ अपराजिता’मध्ये ती नियाच्या भूमिकेत होती. आता अरमान आणि रुहीच्या भूमिकेत हे नवीन कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकू शकतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल