Zakir Hussain: ‘सुंदर क्षण शेअर करतोय…’, झाकिर हुसैन यांची शेवटची पोस्ट, चाहते भावूक
Zakir Hussain Last Video: अखेरचा निरोप घेताना देखील चाहत्यांना आनंद देवून गेले झाकिर हुसैन... सोशल मीडियावर शेवटची पोस्ट शेअर करत म्हणाले, 'सुंदर क्षण शेअर करतोय...', झाकिर हुसैन यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा...

Zakir Hussain Last Video on Social media: तबल्याच्या तालावर सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद झाकिर हुसैन यांनी सोमवारी अखेरचा श्वस घेतला. झाकिर हुसैन यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून झाकिर हुसैन यांनी प्रकृती खालावली होती. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात त्यांना उपचारासाठीसाठी दाखल देखील करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान सोमवारी झाकिर हुसैन यांचं निधन झालं.
झाकिर हुसैन यांच्या निधनानंतर त्यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सर्वत्र व्हायरल होत आहे. हुसैन यांची शेवटची पोस्ट अनेरिकेतील आहे. पोस्ट 6 आठवड्यांपूर्वी त्यांनी सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. या शेवटच्या व्हिडीओमध्ये झाकिर अमेरिकेतील रस्त्यांवर थडं वाऱ्याचा आनंद लुटताना दिसले. त्यांनी हे क्षण सुंदर आणि अद्भुत आहेत असं म्हटलं….




View this post on Instagram
व्हिडीओमध्ये तबला वादक परदेशात आनंद लुटताना दिसले. झाकिर हुसेन स्वतः या व्हिडिओत दिसत नसले तरी पोस्टमधील वातावरण अतिशय आल्हाददायक असून वारेही वाहत असल्याचं दिसत आहे. व्हिडीओ पोस्ट करत हुसैन म्हणाले, ‘सुंदर क्षण शेअर करतोय…’ सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट करत त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
‘या’ आजाराच्या विळख्यात होते झाकिर हुसैन…
झाकिर हुसैन सोशल मीडियावर कायम सक्रिय असायचे… इन्स्टाग्रामवर त्यांचे 297K फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ते कायम पत्नी आणि मुलींसोबत फोटो पोस्ट करायचे. रिपोर्टनुसार, उस्ताद झाकिर हुसेन हे दीर्घकाळापासून हृदयविकाराने त्रस्त होते आणि गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर अमेरिकेत उपचार सुरू होते.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
झाकिर हुसेन यांच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये ब्लॉकेजमुळे त्यांना वेदना होत होत्या. मात्र उच्च रक्तदाबामुळे समस्या आणखी वाढू लागल्या. सध्या झाकीर हुसेन यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फक्त चाहतेच नाही तर, अनेक मोठे स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहात आहेत.