Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्… लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच

Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्… लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच

| Updated on: Sep 25, 2026 | 2:17 PM

लालबागच्या राजाची 2026 मधील विसर्जन मिरवणूक भक्तांसाठी एक अविस्मरणीय सोहळा ठरत आहे. 20 फुटांपेक्षा उंच, सुवर्णजडीत मूर्ती आणि आकर्षक शिवशंकर थीमने मंडप सजला होता. देश-विदेशातून आलेल्या लाखो भाविकांनी राजाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती, जिथे त्यांच्या डोळ्यातून भक्तीचा अनुभव व्यक्त होत होता.

मुंबईच्या गणेशोत्सवाचा मुकुटमणी असलेल्या लालबागच्या राजाची 2026 सालची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडत आहे. देश-विदेशातील लाखो भाविकांनी आपल्या लाडक्या राजाच्या भव्य मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहून अलोट गर्दी केली होती. चेहऱ्यावर मंदस्मित हास्य आणि असीम शांतता दर्शवणारी ही 20 फुटांहून अधिक उंचीची सुवर्णजडीत मूर्ती यंदाही भाविकांना भारावून टाकणारी ठरली.

लालबागच्या राजाचे हे 93वे वर्ष होते आणि शिवशंकर थीमवर आधारित आकर्षक मंडपाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. प्रवेशद्वारापासूनच कैलास पर्वताची आणि शंकराच्या सान्निध्याची अनुभूती देणारे आध्यात्मिक वातावरण तयार करण्यात आले होते. चिंताहरी नवसाला पावणारा राजा अशी ओळख असलेला लालबागचा राजा कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान आहे. या भव्य मिरवणुकीत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत भक्तांचा जनसागर उसळला होता. बाप्पाच्या या तेजोमय रूपाकडे पाहताना शब्दांपेक्षा डोळ्यातूनच जास्त भक्तिभाव व्यक्त होत होता.

 

 

Published on: Sep 25, 2026 2:17 PM
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us