AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुळजापूर शहर प्रवेशबंदीचे तीनतेरा! मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी

नवरात्रोत्सव काळात तुळजापूर शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांसह पायी चालत येणाऱ्यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

तुळजापूर शहर प्रवेशबंदीचे तीनतेरा! मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी
| Edited By: | Updated on: Oct 15, 2020 | 4:44 PM
Share

तुळजापूर: शारदीय नवरात्र मोहत्सवाच्या पार्श्वभूमीवर साडे तीन शक्तीपीठापैकी एक असलेल्या तुळजापूर शहरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पण या प्रवेशबंदीचे पहिल्याच दिवशी तीनतेरा वाजल्याचं पाहायला मिळालं. आज मंदिर परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यामध्ये मास्क न घातलेले भाविकही मोठ्या संख्येनं होते. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचं पालनही कुठे दिसून आलं नाही. त्यामुळं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी आणि तुळजापूरच्या नागरिकांनी प्रशासनानं घालून दिलेले सर्व नियम पायदळी तुडवल्याचं चित्र आज पाहायला मिळालं. ( Crowd of devotees in Tuljapur despite entry ban )

नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिरातून ज्योत घेऊन जाण्यासाठी राज्यभरातून भाविक तुळजापूरमध्ये येतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्ह्याधकारी यांनी यंदाचा नवारोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. सोबतच तुळजापूर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली. पण या प्रवेशबंदीच्या अनुषंगाने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळं प्रवेशबंदीच्या पहिल्याच दिवशी तुळजाभवानी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नवरात्रोत्सव काळात तुळजापूर शहरात दुचाकी, चारचाकी वाहनांसह पायी चालत येणाऱ्यांनाही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

तुळजापूर शहरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोरोना संकटामुळे तुळजापूर प्रवेशबंदी असल्याने याची माहिती शेजारील राज्यांना देण्यात आली होती. पण शेजारी राज्यातील भाविकही देवीच्या दर्शनासाठी येत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं मंदिर ट्रस्ट आणि प्रशासनासमोर भाविकांची समजूत काढण्याचं मोठं आव्हान तयार झालंय.

राज्यात कोरोनाचा जोर कमी दिसत असला तरी धोका टळलेला नाही. त्यामुळं जिल्हाधिकारी आणि मंदिर ट्रस्टच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीत यंदाचा नवरात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

(Crowd of devotees in Tuljapur despite entry ban )

नवरात्र काळात भाविक, नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

नवरात्रात देवीच्या नित्य पूजा, कुलाचार, धार्मिक विधी हे दरवर्षी नियमाप्रमाणे होणार आहेत. मात्र गरबा, दांडिया आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार नाहीत. सार्वजनिक मेळावे आणि समारंभ यांच्यावर निर्बंध असणार आहेत.

उत्सवादरम्यान धार्मिक विधी काळात पुजारी, मानकरी आणि मंदिर अधिकारी असे 50 पेक्षा जास्त व्यक्तिंना उपस्थित राहण्यास परवानगी नाही. पुजारी, मानकरी आणि कुलाचार करणारे नागरिक यांची रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक असणार आहे. व्यापारी आणि इतर कर्मचाऱ्यांची नियमित तपासणी करण्यात येणार आहे

संबंधित बातम्या:

Photos | नवरात्रोत्सवानिमित्त तुळजाभवानी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई

यंदाचा नवरात्र उत्सव भाविकांविनाच, कोजागिरी पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात भाविकांना प्रवेशबंदी

Crowd of devotees in Tuljapur despite entry ban

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.