Rahul Tewatia | 3 कोटीचा खेळाडू, 5 षटकार, सामना पलटवणाऱ्या राहुल तेवतियाची पार्श्वभूमी काय?

पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानच्या राहुल तेवतियाने आतषबाजी खेळी करत एकाच ओव्हरमध्ये पाच गगनचुंबी षटकार खेचले. (RR Who Is Rahul Tewatia)

Rahul Tewatia | 3 कोटीचा खेळाडू, 5 षटकार, सामना पलटवणाऱ्या राहुल तेवतियाची पार्श्वभूमी काय?
Follow us
| Updated on: Sep 28, 2020 | 5:40 PM

मुंबई : किंग्ज इलेव्हन पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाने आतषबाजी खेळी करत एकाच ओव्हरमध्ये पाच गगनचुंबी षटकार खेचले. त्याच्या खेळीमुळे राजस्थानने पंजाबवर रोमहर्षक विजय मिळवला. 27 वर्षीय राहुल तेवतियाने धमाकेदार खेळी करत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. तेव्हापासून राहुल तेवतिया चर्चेत आला आहे. (RR Who Is Rahul Tewatia)

कोण आहे राहुल तेवतिया? राहुल तेवतियाचा जन्म 1993 साली हरियाणात झाला. 2013 साली राहुलने रणजी ट्रॉफीमध्ये डेब्यू केला. प्रथमत: राहुलला लेगस्पिन बोलिंग करायला आवडायची. पण जसजशी त्याला बॅटिंग करण्याची संधी मिळाली तसतसा त्याचा खेळ अधिक बहरू लागला. राहुलला आतापर्यंत फक्त 7 फर्स्ट क्लास सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यामध्ये त्याने 190 रन्स केले आहेत. तर या 7 मॅचमध्ये त्याने 17 विकेट देखील मिळवल्या आहेत. राहुल जास्त करून टी-ट्वेन्टी आणि लिस्ट ए सामने खेळतो. आतापर्यंत त्याने 50 टी-ट्वेन्टी सामने खेळले आहेत. लिस्ट ए सामन्यात 91 ही त्याची सर्वाधिक धावसंख्या आहे.

3 करोड रूपयांचा खेळाडू राहुल तेवतिया 2018 मध्ये सर्वप्रथम चर्चेत आला होता. त्यावेळी आयपीएलच्या विविध संघांमध्ये लिलावात 24 वर्षांच्या तेवतियाला खरेदी करण्याची स्पर्धा होती. त्यावेळी राहुलची किमान रक्कम 10 लाख रूपये होती. मात्र काहीच मिनिटांत त्याची बोली अडीज कोटी रूपयांपर्यंत जाऊन पोहचली. किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी तो पहिल्यांदा खेळत होता. त्या संघाने त्याच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र त्यावेळच्या हंगामासाठी दिल्लीने 3 कोटी रूपये देऊन राहुलला खरेदी केलं.

राहुलची आयपीएलमधील कामगिरी राहुल तेवतियाला 2014 साली प्रथम आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. पंजाबकडून देखील त्याने काही सामने खेळले. पंजाबकडून खेळणाऱ्या डेब्यू सामन्यात त्याने 18 धावा देऊन 2 महत्त्वपूर्ण 2 विकेट्स घेतल्या. त्याचवेळी याच मॅचमध्ये 8 बॉलमध्ये 15 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर तो दिल्लीकडून देखील खेळला. मात्र त्याला तिथे काही खास प्रदर्शन करता आले नाही.

षटकारांचा बादशहा राहुल तेवतिया टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये राहुलचा स्ट्राईक रेट 153 एवढा आहे. त्याचमुळे राजस्थान संघाने त्याच्यावर भरोसा दाखवत त्याला नंबर 4 वर खेळण्याची संधी दिली. राजस्थानचा प्रमुख फलंदाज संजु सॅमसनने सांगितलं की, “नेट्समध्ये सराव करताना राहुल खूप सिक्सर लगावतो. हीच बाब लक्षात घेता टीम मॅनेजमेंटने त्याच्यावर विश्वास दाखवला. जर तो क्रीजवर टिकला तर भल्याभल्या गोलंदाजांना तो सळो की पळो करून सोडेन, असा विश्वास राजस्थानच्या टीम मॅनेजमेंटला होता. तोच विश्वास राहुलने सार्थ करून दाखवला.”

राहुलची पंजाबविरूद्ध धमाकेदार इनिंग

पंजाबविरूद्ध खेळताना तेवतियाने अवघ्या 31 बॉलमध्ये 7 सिक्सच्या मदतीने तुफानी 53 धावा केल्या. त्याच्या या खेळीने राजस्थानने पंजाबचा 4 विकेट्सने पराभव केला. तेवतियाने निर्णायक क्षणी 18 व्या ओव्हरमध्ये शेल्डॉन कॉट्रेलच्या बोलिंगवर 5 बॉलवर 5 सिक्स ठोकले. या फटकेबाजीमुळे सामना राजस्थानच्या बाजूने झुकला. (RR Who Is Rahul Tewatia)

संबंधित बातमी

IPL 2020, RR vs KXIP Live Score Update : राहुल तेवतियाची शानदार खेळी, राजस्थानचा 4 विकेटने विजय

Non Stop LIVE Update
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.