तुमचेही काजळ लावल्यानंतर पसरते का? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स

काजळ लावल्याने डोळे अधिक सुंदर दिसतात. मेकअप करताना काजळ आवर्जून लावले जातेपण योग्य पद्धतीने काजळ न लावल्यास काजळ पसरते आणि संपूर्ण लूक खराब होतो. जाणून घेऊ काही टिप्स ज्यामुळे काजळ दीर्घकाळ टिकेल आणि ते पसरणार देखील नाही.

तुमचेही काजळ लावल्यानंतर पसरते का? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स
Follow us
| Updated on: Jan 10, 2025 | 5:21 PM

मेकअप करायला सर्वच मुलींना आवडते. मुलींच्या आवडत्या मेकअप उत्पादनांपैकी एक म्हणजे काजळ. काजळ वापरल्याने डोळे मोठे दिसतात. त्यामुळे चेहऱ्याला एक वेगळाच लुक येतो. पण अनेक मुलींची अशी तक्रार असते की त्यांचे काजळ फार लवकर पसरते. काजळ पसरल्यानंतर ते अजिबात चांगले दिसत नाही आणि ते डोळ्यांना पूर्णपणे काळे करते. उन्हाळ्यात घामामुळे काजळ पसरण्याची समस्या सामान्य आहे. मात्र हिवाळ्यात देखील अनेक महिलांच्या डोळ्यातील काजळ पसरते…

तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी जात असाल तर घरी येईपर्यंत काजळ जसेच्या तसे ठेवणे हे कुठल्याही आव्हानापेक्षा कमी नाही. कार्यक्रमात किंवा ऑफिसच्या वेळेतच काजळ पसरले तर ते व्यवस्थित करणे अशक्य असते. यामुळे चेहऱ्याचा संपूर्ण लुक खराब होण्याची शक्यता असते. पण आता काळजी करण्याची गरज नाही जाणून घ्या अशा काही टिप्स ज्या फॉलो केल्या नंतर तुम्ही तुमचे काजळ दीर्घकाळ टिकवू शकता.

योग्य काजळ निवडा

बाजारात अनेक प्रकारचे काजळ उपलब्ध आहे. यातील काही काजळ वॉटरप्रूफ आहेत. जर तुमचे काजळ लवकर पसरत असेल तर तुम्हाला वॉटरप्रूफ काजळ वापरण्याची गरज आहे. हे काजळ लवकर पसरत नाही आणि तुमच्या डोळ्यांना आकर्षक जेट ब्लॅक लुक देते.

हे सुद्धा वाचा

प्राइमर वापरा

काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांभोवती प्रायमर किंवा फाउंडेशन लावून बेस तयार करा. यामुळे काजळ पसरत नाही. बेस लावून काजळ लावल्याने काजळ दीर्घकाळ टिकते.

पावडर लावा

काजळ लावण्यापूर्वी डोळ्याखाली हलकी अर्ध पारदर्शक पावडर लावा. पावडर अतिरिक्त तेल शोषून घेते आणि काजळ जास्त काळ टिकण्यास मदत करते. ज्यामुळे तुमचे काजळ पसरत नाही आणि दीर्घकाळ टिकते.

काजळ लावण्याची योग्य पद्धत

काजळ पेन्सिल किंवा ब्रशच्या मदतीने लावले जाते. जर तुम्ही पेन्सिल वापरत असाल तर हलक्या हाताने काजळ लावा. ते फक्त पापणीच्या कडेपर्यंतच मर्यादित ठेवा आणि जास्त जाड रेष बनवू नका.

मेकअप सेटिंग स्प्रे चा वापर करा

काजळ लावल्यानंतर मेकअप सेटिंग स्प्रे अवश्य वापरा. हे काजळ पसरू देत नाही. या पद्धतीने तुम्ही तुमचे काजळ दीर्घकाळ टिकवू शकता. या टिप्स तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतील.

परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?
दादांच्या 'त्या' विधानाचा अर्थ काय? दोषी कोण सरकार की लाडक्या बहिणी?.
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?
रत्नागिरीतून ठाकरे गटाला खिंडार अन्... उदय सामंतांचा मोठा दावा काय?.
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'
अजितदादांची लाडकी बहीण योजनेवर मोठी कबुली; म्हणाले, 'मागे वेळ कमी...'.
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य
'...मी त्यांचा श्रीकृष्ण व्हायला तयार', अभिजीत बिचुकलेंचं मोठं वक्तव्य.
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा
शिंदेंचा लहान फोटो, धनुष्यबाण गायब, माजीमंत्र्याच्या जाहिरातीची चर्चा.
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का
पतीकडून पत्नीची हत्या अन् बनवला व्हिडीओ... कारण ऐकून बसेल धक्का.
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर
नालासोपाऱ्यातील 41 इमारतींवर हातोडा, कित्येक कुटुंब बेघर.
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?
'बाळासाहेब नसते तर काय झालं असतं?' 'सामना' अग्रलेखात नेमकं काय म्हटलं?.