Metabolism Booster : चयापचय वाढवण्यासाठी ‘या’ खास टिप्स फॉलो करा, वाचा याबद्दल सविस्तर!

चयापचय एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे आपण एका दिवसात जे खातो आणि पितो त्याचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. जी आपल्या शरीरात घडते. तुमचा चयापचय दर तुमच्या शरीरात बर्न कॅलरीजची संख्या ठरवतो. हे सर्व काही संतुलित ठेवते .

Metabolism Booster : चयापचय वाढवण्यासाठी 'या' खास टिप्स फॉलो करा, वाचा याबद्दल सविस्तर!
आरोग्य
Follow us
| Updated on: Oct 17, 2021 | 11:58 AM

मुंबई : चयापचय एक प्रक्रिया आहे. ज्याद्वारे आपण एका दिवसात जे खातो आणि पितो त्याचे उर्जेमध्ये रूपांतर होते. ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. जी आपल्या शरीरात घडते. तुमचा चयापचय दर तुमच्या शरीरात बर्न कॅलरीजची संख्या ठरवतो. हे सर्व काही संतुलित ठेवते . जसे की आपल्या रक्तातील साखर, कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तदाब.

जर तुमचा चयापचय दर जास्त असेल तर तुम्ही जास्त कॅलरीज बर्न कराल आणि कॅलरीज बर्न केल्याने तुम्हाला वजन लवकर कमी करण्यात मदत होते. जर तुमचा चयापचय दर मंद असेल तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये हे छोटे बदल करू शकता. हे चयापचय गती वाढविण्यात मदत करतात.

प्रथिने आणि फायबर 

प्रथिने तुम्हाला स्नायू तयार करण्यात मदत करू शकतात तर फायबर तुम्हाला जास्त काळ तृप्त ठेवतात. तुमच्या दैनंदिन आहारात या दोन घटकांचा समावेश केल्याने तुमचे चयापचय गतिमान होईल आणि वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होईल.

हायड्रेटेड रहा

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही दररोज सुमारे आठ ग्लास पाणी पिण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. हायड्रेटेड राहणे महत्वाचे आहे. पाण्याशिवाय तुमचे शरीर व्यवस्थित काम करू शकत नाही. आपण हिरव्या भाज्यांचा रस, लिंबूपाणी किंवा नारळाचे पाणी देखील पिऊ शकता. कारण पुरेसे पाणी नसल्यास आपले चयापचय थांबू शकते.

व्यायाम

साथीच्या आजारामुळे आणि घरातून जास्त बाहेर निघत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळ एकाच जागी बसून आपण काम करतो. मात्र, हे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे. हे तुमचे आयुष्य कमी करू शकते. चयापचय गतिमान करण्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. चयापचय गती वाढवणे देखील वजन कमी करण्यास मदत करते.

चांगली झोप

चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्वाची आहे. आवश्यक तासांपेक्षा कमी झोपल्याने हृदयरोग, मधुमेह आणि तणाव यासह अनेक आजारांचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपण किमान 6-8 तासांची झोप घेणे महत्वाचे आहे.

मसालेदार पदार्थ

तुम्हाला माहीत आहे का की मसालेदार अन्न खाल्याने तुमच्या चयापचयात मदत होते? तुम्ही तुमच्या आहारात काळी मिरी, काळा घरगुती मसाला समावेश करू शकता. त्यात कॅप्सेसीन असते.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Follow these special tips to increase metabolism)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.