कोंड्यापासून मुक्ती हवीये ? त्वरित करा हे उपाय
जर तुम्हाला कोंड्याची समस्या वारंवार होत असेल, तर आहाराकडे व केसांच्या निगरानीकडे लक्ष द्या. योग्य प्रमाणात व्हिटॅमिन- बी2, बी3, बी6 आणि बी9 असलेले पदार्थ खलल्यास केस आणि स्काल्प निरोगी राहतात व कांड्या पासून मुक्ती मिळते. नियमित आहारातील बदल आणि योग्य निगा राखून तुम्ही निरोगी आणि चमकदार केस मिळवू शकता!

डोक्यातील कोंडा ही एक त्रासदायक समस्या असू शकते, परंतु चांगली बातमी अशी आहे की याला हाताळण्यासाठी तुम्हाला महागड्या उपचारांची गरज नाही. डोक्यातील कोंडा उपचार घरगुती उपचार हे टाळूच्या या सामान्य स्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी एक नैसर्गिक आणि किफायतशीर मार्ग देतात. साध्या स्वयंपाकघरातील घटकांपासून ते आवश्यक तेलांपर्यंत, हे उपाय टाळूच्या खाज सुटण्यास मदत करतात आणि ते त्रासदायक पांढरे फ्लेक्स कमी करतात.
यासाठी टॉप 15 घरगुती उपाय जाणून घेऊया डोक्यातील कोंडा उपचार जे तुम्ही घरी सहज वापरून पाहू शकता. तुम्ही कोरड्या टाळूच्या किंवा तेलकटपणाचा सामना करत असाल, हे नैसर्गिक कोंडा उपाय तुम्हाला निरोगी, फ्लेक-मुक्त टाळू मिळवण्यात मदत करू शकतात. तर, सोप्या, प्रभावी पद्धतींचा वापर करून घरातील कोंडा कसा दूर करायचा ते शोधूया.
आजच्या धावपळीच्या जीवनात केसांच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नाही ज्यामुळे अनेकांना डोक्यात कोंड्याची समस्या होऊ शकते. डोक्यातील कोंडा ही एक सामान्य असली तरीही ती फार त्रासदायक असू शकते. फक्त हवेच्या प्रभावाने किंवा केसांची काळजी न घेतल्याने कोंड्याची समस्या होत नाही, तर शरीरातील काही महत्त्वाच्या जीवनसत्त्वांची कमतरता देखील कोंड्याचे मुख्य कारण बनू शकते.
विशेषतः व्हिटॅमिन- बी कॉम्प्लेक्स ( Vitamin B Complex ) च्या कमतरतेमुळे स्काल्प ड्राय होतो आणि केसात खाज निर्माण होऊन कोंड्याची समस्या अधिक तीव्र होते. शरीराला रोजच्या रोज आवश्यक पोषण मिळणे गरजेचे आहे.
कोंडा आणि जीवनसत्त्व ‘बी-कॉम्प्लेक्समधील’ संबंध
१. व्हिटॅमिन- बी2 (रिबोफ्लेविन ) – स्काल्प हेल्दी ठेवतो
व्हिटॅमिन- बी२ (रिबोफ्लेविन ) हे हेल्दी स्काल्पसाठी खूप गरजेचे आहे. व्हिटॅमिन- बी2च्या कमतरतेमुळे स्काल्प ड्राय होतो आणि खाज वाढुन कोंड्याचे प्रमाण वाढते. रिबोफ्लेविन रक्त प्रवाह सुरळीत ठेवतो व केसात आवश्यक ती नमी बनवून ठेवण्यास मदत करतो
व्हिटॅमिन- बी२ची कमी कशी भरून काढाल ?
अंडी , दूध, हिरव्या पाळेभाज्या, कडधान्य, सुकामेवा यांचा समावेश रोजच्या आहारात जास्त पटीने करा
२. व्हिटॅमिन- बी3 (नियासीन ) – स्काल्पला मुलायम ठेवतो आणि केसांना योग्य ते पोषण पोहचवण्यास मदत करतो
व्हिटॅमिन- बी3, ज्याला नियासीन असे ही म्हणतात,या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे स्काल्पला सुज येऊन तो ड्राय पडतो
व्हिटॅमिन- बी3ची कमी कशी भरून काढाल ?
रोजच्या आहारात मासे, चिकन, डाळ, बटाटा खाल्ल्याने व्हिटॅमिन- बी3ची पातळी सुरळीत राहते.
३. व्हिटॅमिन- बी6 (पायरीडॉक्सिन) – केसांना मजबूत ठेवतो
व्हिटॅमिन- बी6 (पायरीडॉक्सिन) केसांच्या त्वचेसाठी एक महत्वपुर्ण जीवनसत्त्व आहे.या व्हिटॅमिनची केसांच्या मजबूतीवर परिणाम होतो.
व्हिटॅमिन- बी6ची कमी कशी भरून काढाल?
रोजच्या आहारात ओट्स, शेंगदाणे, केळी, सोयाबीन, मासे, पालक हे उत्तम राहिल.
४. व्हिटॅमिन- बी9 (फॉलिक ऍसिड) – केस गळती कमी करुन नवीन केसांची वाढ करण्यास मदत करतो
व्हिटॅमिन- बी9 फॉलिक ऍसिडची कमतरता असल्यास केस कमकुवत होतात, केसात जळजळ होते आणि यामुळे कोंड्याची समस्या वाढू शकते.
कमी कशी भरून काढाल?
हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, लिंबू सरबत, संत्री आणि विविध प्रकारच्या डाळी खाल्यास व्हिटॅमिन- बी9ची कमी पूर्ण होते
कोंड्यापासून बचाव करण्यासाठी आहारात काय खाणे योग्य ?
आहारात बदल करा –
जास्तीत जास्त आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य, ओट्स, शेंगदाणे, सोयाबीन, मासे, डाळी, बटाटे व फळांमध्ये संत्री, केळी, सफरचंद अश्या गोष्टींचा समावेश करावा.
कोंडा टाळण्यासाठी सोप्या टिप्स
१. बाहेर जाताना केस कवर करा-
वाढत्या प्रदूषणामुळे केसात चिकचिक होऊन स्काल्प खराब होऊ लागतो. त्यामुळे घरातून बाहेर पडताना कधीही डोक्यावर टोपी घालून किंवा स्कार्फ बांधून निघालेल उत्तम राहिल.
२. केस नैसर्गिक शैम्पूने धुवा –
आजकालच्या कॅमिकल प्रोडक्ट मुळे केस लवकर खराब होतात. त्यामुळे कधीही डॅाक्टरांच्या सल्यानी हेअर केअर करणे योग्य.
३. नियमित तेल लावा –
खोबरेल, बदाम किंवा ओलिव्ह तेल केसांना पोषण देऊन त्यातील कोरडेपण दूर करतो.
४. स्ट्रीट फूड व जंक फूड खाणे टाळा
अनहेल्दी आहार स्काल्पच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो त्यामुळे कधीही घरचे जेवण खाणे योग्य.
५. केस कोमट पाण्याने धुवा –
जास्त गरम पाणी स्काल्पला कोरडे करते आणि डैंड्रफ वाढतो. किंवा जास्त थंड पाणी केस गळती वाढवू शकतो म्हणून कधीही कोमट पाण्याने धुने योग्य.
६. ओल्या केस विंचरू व झटकू नये-
ओले केस झटकल्याने त्यातील कोरडेपणा वाढुन कोंड्याचा त्रास आधीक होऊ शकतो
