AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून बद्धकोष्ठतेपासून मिळवा आराम

बऱ्याच लोकांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यामुळे ही एक सामान्य समस्या आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी आपल्या आहाराकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश केला पाहिजे हे आपण जाणून घेऊयात.

'या' आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून बद्धकोष्ठतेपासून मिळवा आराम
आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करून बद्धकोष्ठतेपासून मिळवा आरामImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 06, 2026 | 4:10 PM
Share

आजकाल अनेक लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. बद्धकोष्ठता म्हणजे शौचास त्रास होणे. कमी फायबरयुक्त आहार, पुरेसे पाणी न पिणे, जास्त वेळ बसून राहणे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयींमुळे हा त्रास होऊ शकतो. बरेच लोकं याकडे एक किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात, परंतु दीर्घकाळ बद्धकोष्ठतेचा त्रास होत असताना आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे . योग्य आहार आणि निरोगी खाण्याच्या सवयींमुळे ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते. विशेषतः फायबरयुक्त पदार्थांचे सेवन आणि पुरेसे पाणी पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. चला तर मग बद्धकोष्ठता कमी करण्यासाठी आपल्या आहारात कोणत्या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करावा, कोणते पदार्थ टाळावेत आणि डॉक्टरांचा सल्ला केव्हा घ्यावा हे जाणून घेऊयात.

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी या आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीजेस (NIDDK) नुसार , बद्धकोष्ठतेसाठी फायबरयुक्त पदार्थ खाणे फायदेशीर ठरू शकते. ओट्स, ब्राऊन राईस आणि गव्हाचे पीठ यांसारख्या पदार्थांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते. तसेच सफरचंद, नासपती, किवी आणि बेरी यांसारख्या फळांमध्ये फायबर आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे शौचास साफ होण्यास मदत होते.

पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या पचनासाठी चांगल्या मानल्या जातात. कडधान्ये, राजमा, चणे आणि मसूर यांमधून फायबर आणि प्रथिने मिळतात, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. तर बदाम, अळशी आणि चिया सीड्स यांसारख्या सुकामेवा आणि बियांमध्येही फायबर भरपूर प्रमाणात असते. तसेच तुमच्या रोजच्या दैनंदिन आहारासोबतच भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे, कारण पाणी आणि फायबर एकत्र मिळून शौचास सुलभ होण्यास मदत करतात.

बद्धकोष्ठता झाल्यास कोणते पदार्थ टाळावेत?

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर कमी फायबर असलेल्या पदार्थांचे सेवन मर्यादित करा. पांढरा ब्रेड, रिफाइंड पीठ, केक, पेस्ट्री, बिस्किटे आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ पचनावर परिणाम करू शकतात. अति प्रमाणात तळलेले आणि फास्ट फूड खाल्ल्यानेही बद्धकोष्ठता वाढू शकते.

जर तुम्ही तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवत असाल, तर भरपूर पाणी प्यायला विसरू नका, कारण पाण्याशिवाय अतिरिक्त फायबरमुळे काही लोकांमध्ये बद्धकोष्ठता वाढू शकते. तुमच्या आहारात संतुलन राखणे आवश्यक आहे.

डॉक्टरांचा सल्ला केव्हा घेणे आवश्यक आहे?

जर बद्धकोष्ठता अनेक आठवडे टिकून राहिली, शौचास जाताना तीव्र वेदना होत असतील, शौचातून रक्त पडत असेल, कोणत्याही प्रयत्नांशिवाय वजन कमी होऊ लागले असेल किंवा सतत पोटदुखी आणि उलट्यांची तक्रार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

याव्यतिरिक्त जर घरगुती उपाय आणि आहारात बदल करूनही आराम मिळत नसेल, तर तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. लवकर उपचार केल्यास बद्धकोष्ठतेचे कारण ओळखण्यास आणि योग्य उपचार सुरू करण्यास मदत होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीत
सप्टेंबरमध्ये मोठा निर्णय! अभिजीत दिपकेंनी सांगितली CJP ची पुढील रणनीती
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
PM Modi–Amit Shah Meeting | मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोदी-शाह यांची तातडीची बैठक; नेमकं काय शिजतंय?
जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर...
Chhatrapati Sambhajinagar | जंतर-मंतर आंदोलनानंतर CJP मध्येच नाराजी; अभिजीत दीपकेंच्या घरासमोर समर्थकाचं आंदोलन
शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात
Shivsena | शिवसेना कुणाची? प्रतिक्षा निकालाची; कोर्टात सुनावणी सुरूवात, आज...
नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
Chandrashekhar Bawankule on Manoj Jarange | नार्को टेस्टलाही तयार!; जरांगेंच्या आरोपांवर बावनकुळेंचं सडेतोड उत्तर
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया...
जरांगे पाटलांच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले कोर्टात...
आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल; जरांगेंचा फडणवीसांना इशारा
Manoj Jarange | आंदोलन पेटलं तर महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल; मनोज जरांगेंचा फडणवीसांना थेट इशारा
उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल
Manoj Jarange | उद्धव ठाकरे यांना बरे म्हणायची वेळ आली; पुन्हा मुंबईत यावं लागेल, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष
वसंत डावखरे मानहानी प्रकरणी मोठी अपडेट! थेट एकनाथ शिंदेंची कोर्टात साक्ष, नेमकं काय घडलं?
डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग...शिंदेंवर जरांगेंची तोफ धडाडली
Manoj Jarange on Eknath Shinde | डबल गेम करू नका, तुमच्या गद्दारीचा डाग... एकनाथ शिंदेंवर मनोज जरांगेंची तोफच धडाडली