बटाट्यांपासून झटपट पौष्टिक आणि चविष्ट सॅलड घरीच बनवा, जाणून घ्या रेसिपी
शरीर थंड ठेवण्यासाठी आणि झटपट पोषण मिळवण्यासाठी काही उत्तम बटाट्याचे सॅलड करून पहा. जेवण बनवण्याचा कंटाळा आला की, बटाट्यांपासून तुम्ही घरीच सॅलड बनवू शकता... तर बटाट्यांचा सॅलड बणवण्याची रेसिपी जाणून घ्या...

बटाटे अनेकांना आवडतात. बटाट्या भाजी, पुरी, पोळी… असं खायला अनेकांना आवडतं. एवढंच नाही तर, तुम्ही कदाचित बटाट्याची भाजी किंवा फ्राईज खाल्ले असतील, पण ताज्या भाज्या, लीन प्रोटीन आणि तुमच्या आवडत्या पदार्थांनी बनवलेले बटाट्यांच्या सॅलडनं तुमचं पोट भरेल आणि तुम्हाला अत्यंत समाधान देईल. पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि फायबरने परिपूर्ण असलेलं हे सॅलड गरम किंवा थंड झाल्यावर देखील तुम्ही खाऊ शकता, ज्यामुळे उष्ण दिवसात शरीराला ताजेपणाची भावना मिळेल.
ग्रीक योगर्ट पोटॅटो सॅलड दुपारच्या जेवणासाठी एक उत्तम पर्याय आहे. उकडलेल्या लहान बटाट्यांमध्ये चिरलेली शेपूची पाने, ओवा, कांदा आणि थोडा लिंबाचा रस मिसळून, त्यावर ग्रीक योगर्ट पसरवून सॅलड बनवा. ग्रीक योगर्टमुळे सॅलडला केवळ प्रथिनेच मिळत नाहीत, तर त्याच्या क्रीमी आणि गोड-आंबट चवीमुळे तोंडाला पाणी सुटते.
जर तुम्ही हलक्या पण पौष्टिक रात्रीच्या जेवणाबद्दल विचार करत असाल तर, तर ग्रील्ड कॉर्न आणि अॅव्होकॅडो पोटॅटो सॅलडला पर्याय उत्तम आहे. बटाटे हलके भाजून घ्या, त्यात भाजलेले मक्याचे दाणे, क्रीमी अॅव्होकॅडो, चेरी टोमॅटो आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि त्यावर लाईम व्हिनेग्रेट टाका. तज्ज्ञांच्या मते, अॅव्होकॅडोमधून आरोग्यदायी फॅट्स मिळतात आणि भाजलेल्या मक्यामुळे सॅलडला एक अप्रतिम स्मोकी चव येते, जी खूप स्वादिष्ट लागते.
जर तुम्हाला जेवण थोडे मसालेदार आणि तिखट आवडत असेल, तर हे मेक्सिकन-शैलीतील बटाट्याचे सॅलड तुमचे मन नक्कीच जिंकेल. उकडलेले बटाटे, उकडलेले काळे बीन्स, मका, ढोबळी मिरची, हिरव्या मिरच्या आणि चेडर चीज एकत्र मिसळा. मग, त्यावर लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑईल, पॅप्रिका आणि जिऱ्याची पूड वापरून तुमचे प्रथिनयुक्त, कुरकुरीत सॅलड तयार होईल
या स्वादिष्ट पेस्टो बटाटा सॅलडमध्ये तुळशीच्या पानांचा ताजेतवाने करणारा सुगंध आणि बटाट्याची गोड चव यांचा सुरेख संगम हवा असल्यास. लहान बटाटे, हलके वाफवलेले बीन्स, पाइन नट्स, पार्मेझान चीज आणि ताज्या तुळशीच्या पेस्टो सॉसमध्ये एकत्र मिसळा. हे सॅलड दिसायला जितके रंगीबेरंगी आणि आकर्षक आहे, तितकाच त्याचा प्रत्येक घास खास ठरतो.
