AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दैनंदिन जीवनात कापूराचे ‘हे’ आश्चर्यकारक उपयोग तुमच्या आरोग्यास ठरतील फायदेशीर

बहुतेक घरांमध्ये रोजच्या पूजेसाठी कापराचा वापर केला जातो. सुगंधी कापरामध्ये अनेक गुणधर्म आहेत त्यामुळे तो जाळणे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर जीवाणू नष्ट करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. यासाठी आजच्या लेखात आपण कापराचा वापर दैनंदिन जीवनात केल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घेऊयात.

दैनंदिन जीवनात कापूराचे 'हे' आश्चर्यकारक उपयोग तुमच्या आरोग्यास ठरतील फायदेशीर
Camphor
| Edited By: | Updated on: Apr 09, 2026 | 12:22 PM
Share

कापूर हा सिनामोमम कॅम्फोरा झाडाच्या लाकडापासून मिळणारा एक पदार्थ आहे. तर कापूर हा आपल्या भारतीय घरांमध्ये रोजच्या पूजेसाठी वापरला जातो. धार्मिक गोष्टींसाठी वापरला जाणारा कापूर हा आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो.अनेक आयुर्वेदिक औषधांमध्येही कापूराचा वापर केला जातो. तसेच कापराच्या मदतीने अनेक प्रकारचे आजारही बरे केले जातात. त्यामुळे कापूर आरोग्यासाठी आणि त्वचा या दोन्हींसाठी फायदेशीर असलेले अनेक गुणधर्म आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण जाणून घेऊ कापूराचे आश्चर्यकारक फायदे कोणते आहेत.

डोकेदुखीपासून आराम

तुम्हाला माहित आहे का की कापरामध्ये वेदनाशामक गुणधर्म देखील आहेत, त्यामुळे कापूर हा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडू शकतो. जर तुम्हाला डोकेदुखी असेल तर थोडा खरा कापूर घ्या आणि तो पांढऱ्या चंदनामध्ये मिक्स करा. ते तुमच्या कपाळावर लावा.यामुळे डोकेदुखीच्या वेदनेपासून त्वरित आराम मिळेल.

दातदुखीपासून आराम

दातदुखी अनेकदा रात्रीच्या वेळी वाढते आणि कधीकधी घरात औषध उपलब्ध नसते. जर तुमच्याकडे कापूर असेल तर तो उपयुक्त ठरू शकतो. चिमूटभर कापूर घेऊन तो दाताखाली दाबा. यामुळे वेदनेपासून आराम मिळेल. दाहशामक आणि वेदनाशामक गुणधर्मांव्यतिरिक्त तो जीवाणू नष्ट करण्यासही मदत करतो.

केसांमध्ये वाढत्या कोंड्यापासून होईल सुटका

डोक्यातील कोंडा ही एक सामान्य समस्या वाटत असली तरी ती खूप त्रासदायक ठरू शकते. खाज आणि कोंड्यामुळे मोठ्याप्रमाणात केसगळतीसुद्धा होऊ शकते. कोंडा कमी करण्यासाठी खोबरेल तेलात थोडे कापूर मिसळा आणि ते तुमच्या स्कॅल्पला लावा. एका तासानंतर शॅम्पूने केस धुवा. दोन ते तीन वेळा असे केल्याने चांगला परिणाम दिसून येईल.

त्वचेसाठी कापूर फायदेशीर

जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांचे डाग असतील तर ते कमी करण्यासाठी कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावू शकता. यामुळे त्वचेचा रंगही कमी होऊ शकतो. मात्र कापूर अत्यंत कमी प्रमाणात वापरण्याची आणि ते लावल्यानंतर सूर्यप्रकाशात जाणे टाळण्याची काळजी घ्या. याव्यतिरिक्त खोबरेल तेल आणि कापूर यांचे मिश्रण लावल्याने पुरळ आणि कोरड्या खाजेपासूनही आराम मिळू शकतो.

सर्दी आणि खोकल्यापासून आराम

कापूर सर्दी आणि खोकल्यापासूनही आराम देऊ शकतो. जर तुमचे नाक बंद असेल तर थोडा कापूराचा वास घ्या. यामुळे त्वरित आराम मिळेल. किंवा तो तिळाच्या किंवा मोहरीच्या तेलात मिसळून आपल्या पाठीला आणि छातीला हळुवारपणे मालिश करा. यामुळे खोकला आणि बंद नाक व घशापासून आराम मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख
ई केवायसीच्या नावाखाली महिलेकडून शरीर सुखाची मागणी, जळगावातील घटनेने ख.
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! पुढील 18 तास काही भागातील पाणी पुरवठा बंद.
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर...
आढावा बैठकीत शेजारी बसूनही शिरसाट, सत्तारांचा अबोला, भर मंचावर....
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय
एका युगाचा अंत! अजरामर गीतांना स्वर देणाऱ्या आशाताईंचा अल्पपरिचय.
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज
आशा भोसले यांना अशोक सराफ यांनी वाहिली आदरांजली, म्हणाले त्यांचा आवाज.
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ
सुरांचा अमर आवाज हरपला... आशा भोसलेंच्या निधनावर देवेंद्र फडणवीसांचं भ.
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध
संगीत क्षेत्रातला जादूई स्वर हरपला! ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं निध.
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा
संजय राऊतांनी केले पाकिस्तानचे कौतुक, नेमकं काय म्हणाले? पाहा.
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?
मुंबईसह उपनगरात CNG च्या किमती वधारल्या, किती रुपयांवर पोहोचले दर?.
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्
नाशिकमध्ये महिलांशी गैरवर्तन करणाऱ्या संशयितांचे मोबाईल जप्त, सापडलेल्.