Health : पोट बिघडल्यावर या भाज्या खाताल तर आणखी वाढेल त्रास, जाणून घ्या.
पोट बिघडल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत लोकांमध्ये संभ्रम देखील निर्माण होतो. तर आता आपण पोट बिघडल्यानंतर कोणत्या भाज्यांचे खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये याबाबत जाणून घेणार आहोत.

मुंबई : सध्याच्या काळात लोक बाहेरचे फास्ट फूड मोठ्या प्रमाणात खाताना दिसतात. तसेच बदलत्या वातावरणामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तर बाहेरच्या फास्ट फूड मुळे आणि बदलत्या वातावरणामुळे बहुतेक लोकांना पोटाशी संबंधित समस्या निर्माण होताना दिसतात. त्यातील एक समस्या म्हणजे पोट बिघडणे. जेव्हा ही पोट बिघडते तेव्हा लोकांची प्रतिकारशक्ती देखील कमी होते. त्यात पोट बिघडल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये याबाबत लोकांमध्ये संभ्रम देखील निर्माण होतो. तर आता आपण पोट बिघडल्यानंतर कोणत्या भाज्यांचे खाव्यात आणि कोणत्या भाज्या खाऊ नये याबाबत जाणून घेणार आहोत.
पोट बिघडल्यानंतर कोणत्या भाज्या खाव्यात
पोट खराब झाल्यानंतर हलका आहार घेणं गरजेचं असतं. तसंच पोटात गॅस होणार नाही असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे. तर पोट बिघडल्यानंतर ज्या भाज्या पचनास सुलभ असतात अशा भाज्या खाल्या पाहिजेत. तसंच पोट बिघडल्यानंतर पोटातील पाणी कमी होते त्यामुळे ज्या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते अशा भाज्याही पोट खराब झाल्यानंतर खाणं गरजेचं आहे. तर अशावेळी कोबी, टोमॅटो, दुधीभोपळा, ब्रसेल्स स्प्राउट, आलं, ब्रोकोली या भाज्यांचा समावेश आहारात करावा.
पोट बिघडल्यानंतर कोणत्या भाज्या खाऊ नये
ज्या भाज्यांमध्ये फायबर, प्रोटीन जास्त असते अशा भाज्या पोट बिघडल्यानंतर खाऊ नये. कारण या भाज्या पचण्यास जड असतात. त्यामुळे पोट बिघडल्यानंतर अशा भाज्या पचवणं अवघड होऊन जातं. तसंच ज्या भाज्यांमध्ये फायबर, प्रोटीन असतात त्या भाज्या पोटात गॅस तयार करतात. त्यामुळे पोट बिघडल्यानंतर अशा भाज्या खाऊ नये. तर पोट बिघडल्यानंतर कांदा, फुलकोबी, वाटाणा, मशरूम, बीन्स या भाज्या खाऊ नयेत.
पोट बिघडल्यानंतर तुम्हीही कोणत्या भाज्या खायच्या आणि कोणत्या खायच्या नाहीत याची काळजी घ्या. तसंच डॉक्टरांकडून योग्य तो सल्ला आणि उपचार घेऊन योग्य आहार घ्या.
