AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेसळयुक्त खाद्यतेल ओळखण्यासाठी FSSAI सांगितली खास ट्रिक, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!

भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सध्याच्या काळात बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त आहेत. त्याचे आपण सेवन केल्याने आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत.

भेसळयुक्त खाद्यतेल ओळखण्यासाठी FSSAI सांगितली खास ट्रिक, जाणून घ्या याबद्दल सविस्तर!
खाद्यतेल
| Edited By: | Updated on: Sep 27, 2021 | 2:49 PM
Share

मुंबई : भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे. सध्याच्या काळात बाजारामध्ये अनेक पदार्थ भेसळयुक्त आहेत. त्याचे आपण सेवन केल्याने आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता असते. भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी अनेक प्रकारचे संशोधने केली जात आहेत. मात्र, नुकताच FSSAI ने एका व्हिडीओव्दारे भेसळयुक्त पदार्थ ओळखण्यासाठी काही सोप्पा टिप्स सांगितल्या आहेत. Video shared by FSSAI to identify adulterated cooking oil

या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आले की, आपण बाजारातून आणलेल्या तेलामध्ये भेसळ आहे की नाही हे कसे ओळखायचे. यासाठी तुम्ही एक चमचा तेल घ्या. आता या तेलामध्ये 4 मिली वॉटर मिक्स करा. त्यानंतर टेस्ट ट्यूबमध्ये दोन थेंब टाका. जर तुमच्या तेलात भेसळ नसेल तर वरती कोणताच रंग येणार नाही. पण जर तुम्ही आणलेले तेल हे भेसळयुक्त असेल तर वरती आम्लाचा रंग बदलेल.

तेलामध्ये मेटॅनिल असेल तर ते आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिरकारक आहे. तज्ञांच्या मते, मेटॅनिल हा विनापरमिट खाद्य रंग आहे, जो भारतात मोठ्या प्रमाणावर वापरला जात आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते, मेटॅनिल मानवांना खाण्यासाठी योग्य नाही आणि त्याचे विपरित परिणाम मानवी शरीरावर होतात. विशेष म्हणजे भेसळयुक्त तेलाचा रंग बदलतो. यामुळे आपण नेहमी तेलाच्या रंगावर लक्ष ठेवले पाहिजे.

सामान्यत: बाजारात विकल्या जाणाऱ्या डाळींचा रंग टिकवण्यासाठी त्या ‘मेन्टील ​​यलो पेंट’ने रंगवल्या जातात. त्याची तपासणी करण्यासाठी आपल्याला हायड्रोक्लोरिक अॅसिडची आवश्यकता असते. चाचणीसाठी थोडी मसूर डाळ घेऊन ती पाण्यात टाका आणि त्या पाण्यात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे चार थेंब घाला. जर, मसूर डाळीमध्ये भेसळ केली तर पाण्याचा रंग लाल होईल. असे आढळल्यास सावधगिरी बाळगा अन्यथा मूत्रपिंडासंबंधित समस्या किंवा पाचन तंत्राचा त्रास होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Video shared by FSSAI to identify adulterated cooking oil)

मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र
मोदी अन् EVM असल्यानं माज करताहेत, एकत्र या... राज ठाकरेंचा कानमंत्र.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून 102 जणांना AB फॉर्मचे वाटप, कोणाला उमेदवारी?.
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर
ठाकरे यांच्या शिवसेनेची 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी
BMC निवडणुकीत भाजपचे युवा चेहरे, 'या' नव्या चेहऱ्यांना पक्षाकडून संधी.
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं
मुंबईत पालिकेसाठी भाजपची पहिली यादी जाहीर, एकूण 66 उमेदवारांची नावं.
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका
राज्यात सर्वत्र गुंडांना राजकीय सुगीचे दिवस, सामनातून महायुतीवर टीका.
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.