AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Bone And Joint Day: वृद्धापकाळात पडणे आणि दुखापतीचा धोका कसा कमी करायचा? जाणून घ्या, सोपे उपाय

World Bone And Joint Day: वयोमानानुसार हाडे कमकुवत होतात, त्यामुळे पडल्यामुळे फ्रॅक्चर होण्याची शक्यता अधिक असते. ही चिंताजनक बाब आहे. जाणून घ्या, आपल्या घरातील वयोवृद्धांसाठी आपण हा धोका कसा कमी करू शकतो.

World Bone And Joint Day: वृद्धापकाळात पडणे आणि दुखापतीचा धोका कसा कमी करायचा? जाणून घ्या, सोपे उपाय
Image Credit source: सोशल मीडिया
| Edited By: | Updated on: Aug 04, 2022 | 2:29 PM
Share

World Bone And Joint Day: वल्ड बोन ॲण्ड ज्वाईंट डे निमित्त आज आपण बघणार आहोत. आपल्या घरातील वयोवृद्धांच्या हाडाची निगा (Bone care in the elderly) कशी राखावी ते, कारण वयोवृद्धांना वाढत्या वयासह डोळ्यांच्या किंवा संतुलनाशी संबंधित (Relating to balance) समस्या जाणवतात, ज्यामुळे त्यांचे पडण्याचा धोके वाढतात. ओल्या आणि निसरड्या पृष्ठभागावर हा धोका अधिक असतो. ज्यात ऑस्टिओपोरोसिस आणि संधिवाताचा समावेश असून या मुळे हाडे वाढत्या वयानुसार कमकुवत होऊ लागतात. ऑर्थोपेडिक सर्जन सांगतात की, “ऑस्टिओपोरोसिसमुळे, अगदी किरकोळ पडल्यानेही फ्रॅक्चर होऊ शकते, सामान्यतः मनगट, मणक्याचे आणि नितंबाच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर (Fractures in bones) होतात. डोके आणि छातीला गंभीर दुखापत देखील होऊ शकते. ऑस्टियोपोरोटिक हाडांच्या फ्रॅक्चरला बरे होण्यास वेळ लागतो आणि दीर्घकाळ विश्रांतीची आवश्यकता असू शकते. ऑस्टियोपोरोटिक हाडांची शस्त्रक्रिया देखील आव्हानात्मक असते. त्यामुळे, पडणे टाळण्यासाठी, विशेषतः वयानुसार, अडचणी टाळण्यासाठी या सर्व काळजी घेणे आवश्यक आहे.”

पावसाळ्यात दुखापतीचा धोका वाढतो

तज्ज्ञ सांगतात, की “वृद्ध लोकांना पावसाळ्यात दुखापत होण्याचा धोका जास्त असतो. घरात किंवा कामाच्या ठिकाणी ओलसर फ्लेाअर(फरशी) किंवा ओबड-धोबड रस्त्यांवर तोल गेल्यामुळे अपघात होवून पडण्याच्या अधिक भीती असते. ज्येष्ठ नागरिकांमध्ये ऑस्टिओपोरोसिस ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बहुतेक रुग्णांमध्ये आढळतो. विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाण आहे. हिप, मणक्याचे, मनगटाचे, घोट्याचे किंवा खांद्याचे फ्रॅक्चर आदी दुखापती सामान्य आहे.

ही समस्या टाळता येईल का?

वृद्धांनी असे शूज किंवा चप्पल घालावी, जी घसरत नाही. समतोल राखण्यासाठी वॉकिंग स्टिकचा वापर चांगला होईल. याशिवाय वेळोवेळी डोळे तपासा, रात्रीच्या वेळीही दिवे किंवा छोटे दिवे लावा, तसेच घराभोवती पथदिव्यांची व्यवस्था करा. घरामध्ये लहान कार्पेट किंवा चटई ठेवू नका ज्यामध्ये पाय अडकल्यास पडू शकता.

दुखापत टाळण्यासाठी काय केले पाहिजे?

ज्येष्ठ नागरिकांनी पावसाळ्यात योग्य पादत्राणे घालावेत, जेणेकरून तोल जाऊन पडणार नाहीत आणि संतुलनही चांगले राहील. त्याच प्रमाणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे. दररोज व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि हाडे मजबूत होतात, ज्यामुळे संतुलन देखील सुधारते. ऑस्टियोपोरोसिस हा एक आजार आहे आणि तो लवकर शोधून त्यावर योग्य उपचार केले पाहिजेत.  नाहीतर समस्या वाढू शकतात.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.