AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Brain Day 2023 : सुपीक मेंदू हवा असेल तर हे पदार्थ नक्की खा

स्मार्ट आणि हुशार बनायचं असेल तर मेंदू शार्प होण्यासाठी योग्य आहार गरजेचा असतो. त्यामुळे शारीरिक व मानसिक विकासास मदत होते.

World Brain Day 2023 : सुपीक मेंदू हवा असेल तर हे पदार्थ नक्की खा
Image Credit source: freepik
| Updated on: Jul 21, 2023 | 4:38 PM
Share

World Brain Day 2023 : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी, योग्य आहार आणि चांगल्या जीवनशैलीचे पालन करणे खूप महत्वाचे असते. यामुळे आपण आजारांपासून तर दूर राहतो, पण मानसिक विकासही (mental growth) चांगला होतो. डॉक्टर नेहमी सांगतात की लहानपणापासूनच मुलांच्या मेंदूचा विकास होतो, त्यामुळे त्यांना तेव्हापासून पौष्टिक आणि संतुलित आहार (good food) दिला पाहिजे.

मुलांना हुशार आणि स्मार्ट बनवायचे असेल तर त्यांच्या आहाराची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. आजकाल बहुतेक मुले ही घरातील पौष्टिक, सकस अन्न न खाता प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूड खाताना दिसतात. मात्र त्याच्या विपरीत परिणाम त्यांच्या शारीरिक आरोग्यावर आणि मानसिक विकासावरही होतो. मुलांचा मेंदू शार्प करण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश योग्य ठरतो ते जाणून घेऊया.

दररोज अंड खावे

संडे हो या मंडे.. रोज खाओ अंडे असं म्हणताता ते काही खोटं नाही. अंड्यांमध्ये प्रथिने तर असताताच पण त्याव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी आणि बी यासह अनेक पोषक घटक असतात. अंडी खाल्ल्याने मुलांचे शारीरिक आरोग्य तर चांगले राहतेच, पण मेंदूच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर असते. तसेच अंड्यातील त्यातील ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि फॉलिक ॲसिड मानसिक विकासासाठी चांगले असते.

दूध

दुधाला पूर्णान्न असंही म्हटलं जातं. त्यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स यासह अनक पोषक घटनक असतात. दुधातील कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन्स ही मुलांच्या विकासात मदत करतात. त्यामुळे रोज दुधाचे सेवन उत्तम मानले जाते.

ड्राय फ्रूट्स

मुलांचा मेंदू तीक्ष्ण करण्यासाठी त्यांना रोज सुका मेवा खायला द्यावा. विशेषतः अक्रोड आणि बदाम हे मेंदूसाठी खूप फायदेशीर मानले जातात. मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी दुधात ओट्स किंवा नट्स टाकून ड्रायफ्रुट्स देता येऊ शकतात.

भाज्या

आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व ही भाज्यांमधून मिळतात. भाज्या खाल्ल्याने शरीर निरोगी तर राहतेच पण प्रतिकारशक्ती वाढल्याने आजारांशी लढण्याची क्षमताही मिळते. रोज भाज्या खाल्ल्याने मेंदूचे आरोग्यही चांगले राहते, असे डॉक्टर सांगतात. सिमला मिरची, गाजर, ब्रोकोली, पालक यांसारख्या भाज्या मानसिक विकासासाठी फायदेशीर मानल्या जातात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.