Ukraine Attack Russia : रशियाला भीषण हल्ल्यांनी हादरवलं, शांतता चर्चेआधीच जेलेंस्कींकडून दगा का?
Ukraine Attack Russia : युक्रेनचे राष्ट्रप्रमुख जेलेंस्की यांनी चर्चेला बसण्याआधी रशियाला भीषण हल्ल्यांनी हादरवलं आहे. रशियन राजधानी मॉस्कोसह अनेक इमारतींना टार्गेट करण्यात आलय. युक्रेनकडून रशियावर तासभर हा हल्ला सुरु होता.

रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या तीन वर्षांपासून सुरु असलेलं युद्ध थांबवण्यासाठी लवकरच शांतता चर्चा सुरु होणार आहे. त्यासाठी जेलेंस्की, अमेरिकेचे मंत्री मार्को रुबियो आणि रशिया अधिकारी सौदी अरेबियात पोहोचले आहेत. ही शांतता चर्चा सुरु होण्याआधी जेलेंस्की यांनी ड्रोन हल्ल्याने रशियाला हादरवलं. मंगळवारी मॉस्कोवर युक्रेनने मोठा हल्ला केला. मॉस्कोवर एकाचवेळी 70 ड्रोन्स डागण्यात आले.
युक्रेनकडून रशियावर एकतास हल्ला सुरु होता. या हल्ल्यात अनेक रहिवाशी इमारतींना लक्ष्य करण्यात आलं. रशियाची राजधानी मॉस्कोच्या जवळ असलेल्या शहारांवर हा ड्रोन हल्ला झाला. माहितीनुसार, कोलोम्ना आणि डोमोडेडोवो येथे अनेक हल्ले झाले. या हल्ल्यानंतर जेलेंस्की यांच्या हेतूबद्दल संशय निर्माण झाला आहे.
किती जिवीतहानी ?
रशियन एअर डिफेन्सने जवळपास 58 ड्रोन्स नष्ट केले आहेत. युक्रेनकडून सतत हल्ले सुरु आहेत. या हल्ल्यांमुळे मॉस्को एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे. अनेक विमान उड्डाण प्रभावित झाली आहेत. या हल्ल्यात किती जिवीतहानी झालीय, त्या बद्दल माहिती देण्यात आलेली नाही. या हल्ल्यांमुळे जेद्दा येथे होणारी शांतता चर्चा प्रभावित होऊ शकते.
रशिया-युक्रेन युद्धातील निर्णायक दिवस
रशिया-युक्रेन युद्ध सुरु होऊन तीन वर्षांपेक्षा जास्त वेळ झालाय. सौदी अरेबियात आज अमेरिका, युक्रेन आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार आहे. शस्त्र संधी करारावर या बैठकीत एकमत होईल अशी अपेक्षा आहे. शांतता चर्चेसंबंधी अमेरिकी आणि रशियन अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. पण आता होणारी चर्चा निर्णायक मानली जात आहे. कारण राष्ट्रपती जेलेंस्की स्वत: सौदी अरेबियात उपस्थित आहेत.
क्राऊन प्रिन्सच कौतुक
मंगळवारी युक्रेनचे राष्ट्रप्रमुख सौदी अरेबियात दाखल झाले. त्यांचं मोहम्मद बिन सलमान यांनी स्वागत केलं. जेद्दा येथे रवाना होण्यापूर्वी जेलेंस्की यांनी शांतता चर्चेच्या प्रयत्नांबद्दल सौदी अरेबियाच्या सरकारचे आभार मानले. मध्यस्थतेसाठी मोहम्मद बिन सलमान यांच्या भूमिकेच कौतुक केलं. रशिया-युक्रेन युद्धात आतापर्यंत युक्रेनने आपला बराच भूभाग गमावला आहे. युद्धात दोन्ही बाजूचे सैनिक मोठ्या प्रमाणात मृत्यूमुखी पडले आहेत.
