AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता आम्हाला हल्ला करायचाय…इशारा देत ट्रम्पचा अचंबित करणारा निर्णय; नेमकं काय घडतंय?

रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांसोबत त्यांनी बैठकाही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबावे म्हणून अमेरिकेने बळाचाही वापर केला आहे. अधूनमधून ट्रम्प हे युद्धाची धमकीही देत असतात. दरम्यान, आता ट्रम्प यांनी एका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेतील नागरिकांसह जगातील इतर देशांनाही अनेक प्रश्न पडले आहेत.

आता आम्हाला हल्ला करायचाय...इशारा देत ट्रम्पचा अचंबित करणारा निर्णय; नेमकं काय घडतंय?
donald trump
| Updated on: Aug 26, 2025 | 6:59 PM
Share

Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अन्य काही देशांवर टॅरिफ लावला आहे. ते दुसरीकडे युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धालाही थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. रशिया आणि युक्रेनच्या अध्यक्षांसोबत त्यांनी बैठकाही घेतल्या आहेत. विशेष म्हणजे इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्ध थांबावे म्हणून अमेरिकेने बळाचाही वापर केला आहे. अधूनमधून ट्रम्प हे युद्धाची धमकीही देत असतात. दरम्यान, आता ट्रम्प यांनी एका मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे अमेरिकेतील नागरिकांसह जगातील इतर देशांनाही अनेक प्रश्न पडले आहेत.

अमेरिकेत नेमकं काय घडतंय?

मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प हे पेंटागॉनचे नाव बदलून ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’ असे ठेवण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेला आता संरक्षणाची गरज नाही. आपल्या देशाला आक्रमण करण्याचीही गरज आहे, त्यामुळेच पेंटागॉनचे नाव बदलायला हवे, असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले आहे. तसेच आगामी काही दिवसात याबाबतची घोषणा होऊ शकते, अशी माहितीही ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे म्यूंग यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पेंटागॉनच्या नामकरणावर भाष्य केले.

मला फक्त संरक्षण विभाग नकोय

“आपण जेव्हा प्रथम आणि द्वितीय विश्वयुद्ध जिंकले होते तेव्हा पेंटागॉन हा युद्धविभाग म्हणून ओळखला जायचा. खरं म्हणजे माझ्यासाठी अजूनही हा विभाग युद्धविभागच आहे. ही जागा जेव्हा युद्धविभाग म्हणून ओळखली जायची तेव्हा आपल्याकडे विजयाचा एक अविश्वसनीय इतिहास होता, असे प्रत्येकालाच वाटते. नंतरच्या काळात या विभागाचे नाव बदलून संरक्षण विभाग असे ठेवण्यात आले,” असे ट्रम्प यावेळी म्हणाले. तसेच मला फक्त संरक्षण विभाग नको आहे. अमेरिकेला हल्लादेखील करायचा आहे, असे सांगत त्यांनी लवकरच पेंटागॉनचे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर असे ठेवले जाईल, असे सूचित केले.

नाव बदलून नेमकं काय होणार? ट्रम्प यांच्या मनात काय आहे?

दरम्यान, आता डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या विधानानंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. पेंटागॉनचे नाव बदलून डिपार्टमेंट ऑफ वॉर करण्यामागे ट्रम्प यांचा नेमका उद्देश काय आहे? यातून नेमके काय साध्य होणार आहे? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी