AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Iran War : भारताने पाकची सर्व मिसाइल्स रोखली, पण इस्रायलला इराणची मिसाइल्स रोखणं का जमत नाहीय?

Israel-Iran War : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी चार दिवसाच्या लढाईत भारताने पाकिस्तानला भरपूर धुतलं. पाकिस्तानने सुद्धा भारतावर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सुद्धा भारतावर साधीसुधी रॉकेट्स नाही, बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. पण भारताच्या एअर डिफेन्स प्रणालीने ही मिसाइल्स हवेतच नष्ट केली. पण इस्रायलला इराणचा असा मिसाइल हल्ला का रोखता येत नाहीय?

Israel-Iran War : भारताने पाकची सर्व मिसाइल्स रोखली, पण इस्रायलला इराणची मिसाइल्स रोखणं का जमत नाहीय?
Missile AttackImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 12:40 PM
Share

पश्चिम आशिया पुन्हा एकदा युद्धाच्या आगीत होरपळतोय. इराणला अणवस्त्र बनवण्यापासून रोखण्यासाठी म्हणून इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात इराणचे अनेक अणवस्त्र तळ नष्ट झाल्याचा दावा इस्रायलने केला आहे. या हल्ल्यात इराणच्या लष्कर प्रमुखांसह काही अणवस्त्र वैज्ञानिक मारले गेले. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणने युद्धाची घोषणा केली आहे. इराणने इस्रायलवर मिसाइल आणि ड्रोन हल्ले केले. इराणच्या हल्ल्यात इस्रायलची राजधानी तेल अवीवसह अनेक शहरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. सध्या दोन्ही बाजूंकडून मिसाइल हल्ले सुरु आहेत. यात इस्रायलच्या बाजूला सुद्धा मोठं नुकसान झालय. त्यांच्याकडे अनेक इमारती कोसळल्या आहेत. इमारतींचे अवशेष उरले आहेत. इस्रायलकडे आर्यन डोम, डेविड स्लिंज आणि Arrow सारखी अभेद्य एअर डिफेन्स प्रणाली आहे.

मात्र, तरीही इराणी मिसाइल्सनी इस्रायलमध्ये एवढ मोठ नुकसान कसं केलं? इस्रायली सिस्टिम इराणी मिसाइल्स का रोखू शकली नाही? असे प्रश्न विचारले जात आहेत. इराणकडून अशी कुठली मिसाइल्स डागण्यात आली, जी आर्यन डोमला रोखता आली नाहीत. इस्रायलकडे जी एअर डिफेन्स सिस्टिम आहे, त्याची तुलना रशियाच्या S-400 आणि S-500 सिस्टिमशी केली जाते. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी S-400 ची ताकद सगळ्या जगाने पाहिली. पण इस्रायली आर्यन डोम, डेविड स्लिंज आणि Arrow सिस्टिम इराणी मिसाइल्सना पूर्णपणे रोखू शकले नाहीत.

इस्रायलला मिसाइल्स का रोखता आली नाहीत? कारण काय?

याचं कारण आहे, हायपरसोनिक मिसाइल्स. इराणने फतह-1 या हायपरसोनिक मिसाइलद्वारे इस्रायलवर हल्ला केला. इराणला जर इस्रायलच्या क्रिटिकल मिलिट्री इंस्‍टॉलेशनवर मिसाइल हल्ला करायचा असेल, तर त्याची रेंज कमीत कमी 1000 किलोमीटर असली पाहिजे. इराणच्या शक्तीशाली मानल्या जाणाऱ्या फतह-1 या हायपरसोनिक मिसाइलची रेंज 1400 किलोमीटरच्या आसपास आहे. हायपरसोनिक असल्यामुळे याचा वेगही प्रचंड आहे. सिक्‍युरिटी एक्‍सपर्टनुसार, हायपरसोनिक मिसाइल लो एल्‍टीट्यूड म्हणजे कमी उंचीवरुन उड्डाण करण्यासाठी सक्षम असतात.

पाकिस्तानचा हल्ला भारताने कसा परतवला?

लो एल्‍टीट्यूडमुळे ही मिसाइल्‍स रडारला सहज चकवा देतात. तज्ज्ञांनुसार, या कॅटेगरीची मिसाइल्स एअर डिफेन्स सिस्टिम्सला बायपास करु शकतात. म्हणून इराण अभेद्य सुरक्षा कवच भेदून इस्रायलमध्ये आतमध्ये खोलवर हल्ले करण्यात यशस्वी ठरला. पाकिस्तानकडे अजून हायपरसोनिक मिसाइल्स नाहीयत. पाकिस्तानने बॅलेस्टिक मिसाइल्स डागली होती. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने ही मिसाइल्स हवेतच नष्ट केली.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.