नेपाळच्या अयोध्यापुरीतही राम मंदिर बांधणार, थेट अर्थसंकल्पात निधीच्या तरतुदीची घोषणा

नेपाळमध्ये (Nepal) मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता तयार झालेली आहे. सत्ताधारी पक्षात दोन गट पडल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.

नेपाळच्या अयोध्यापुरीतही राम मंदिर बांधणार, थेट अर्थसंकल्पात निधीच्या तरतुदीची घोषणा


काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal) मोठ्या प्रमाणात राजकीय अस्थिरता तयार झालेली आहे. सत्ताधारी पक्षात दोन गट पडल्यानं राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. अशातच नेपाळ सरकारने प्रस्तावित अर्थसंकल्पात नेपाळमधील प्रसिद्ध पशुपतिनाथ मंदिराच्या दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपये आणि अयोध्यापुरीत राम मंदिराच्या (Temple of Ram) बांधकामासाठी निधी ठेवण्यात आलाय. नेपाळचे अर्थमंत्री बिष्णु पौडयाल यांनी याबाबत घोषणा केलीय. यावेळी त्यांनी नेपाळमधील कोविड-19 मुळे पर्यटनाला फटका बसल्याचं सांगत पर्यटन वाढवण्यासाठी नेपाळमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी 1 महिन्याच्या विजात (Visa) सूट देण्याची घोषणा केली (Fund sanction for Ram temple construction in Ayodhyapuri of Nepal).

अर्थ मंत्रालयाने 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि इतर देशांतर्गत विमानतळांवर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी जवळपास 20 अब्ज रुपयांची तरतूद केली. पौडयाल यांनी यूनेस्कोच्या वारसा स्थळांच्या यादीत समावेश असलेल्या पशुपतिनाथ मंदिराच्या दुरुस्तीसाठी 35 कोटी रुपयांची तरतूद केली. तसेच चितवन जिल्ह्यातील अयोध्यापुरीच राम मंदिर बांधण्यासाठीही निधी दिला.

राम मंदिरासाठी किती निधी याचा खुलासा नाही

नेपाळच्या अर्थमंत्र्यांनी राम मंदिरासाठी निधी दिल्याची घोषणा केली, मात्र नेमका किती निधी दिला याबाबत काहीही खुलासा केलेला नाही. नेपाळने सरकारने 1647.67 अब्ज रुपयांच्या अर्थसंकल्पाची घोषणा केली. ही घोषणा अशावेळी केलीय जेव्हा देशात राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. नेपाळचे राष्ट्रपती विद्या देवी भंडारी यांनी 22 मे रोजी देशातील 275 सदस्यीय संसदेला 5 महिन्याच्या काळात दुसऱ्यांदा विसर्जित केलं होतं. तसेच पंतप्रधान के पी शर्मा ओली यांच्या सल्ल्यानुसार, 12 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर रोजी मध्यावधी निवडणुका घोषित केल्या होत्या.

पंतप्रधान ओलींचं सरकार अल्पमतात

ओली नेपाळमध्ये अल्पमताचं सरकार चालवत आहेत. पंतप्रधान ओली यांनी राष्ट्रपतींच्या संसद विसर्जित करण्याच्या निर्णयाला योग्य ठरवण्यासाठी 28 मे रोजी सर्व राजकीय पक्षांसोबत आघाडीचं सरकार स्थापन करण्याची आणि निवडणूक घेण्याची मागणी केलीय. राष्ट्रपतींनी संसद बरखास्त केल्यानंतर ओली यांनी एक आठवड्याने टेलिव्हिजनवरुन राष्ट्राला संबोधित करत निवडणूक घेणं प्रतिगामी असू शकत नाही, असं मत व्यक्त केलं.

हेही वाचा :

नेपाळमध्ये कोरोनाच्या संकटातही ‘पावसाच्या देवाची’ रथयात्रा, पाहा फोटो…

नेपाळमध्ये मोठं राजकीय संकट! पंतप्रधान केपी शर्मा ओली विश्वासदर्शक ठराव हरले

Corona on Everest : जगातील सर्वात उंच पर्वतावरही कोरोना पोहचला, माऊंट एव्हरेस्टवरील गिर्यारोहकाला संसर्ग

व्हिडीओ पाहा :

Fund sanction for Ram temple construction in Ayodhyapuri of Nepal

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI