PHOTOS : नेपाळमध्ये कोरोनाच्या संकटातही ‘पावसाच्या देवाची’ रथयात्रा, पाहा फोटो…

नेपाळच्या नागरिकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत उत्सव साजरे करण्याचा प्रकार केलाय.

1/6
नेपाळमध्ये कोरोना विषाणूने (Coronavirus) कहर केलाय. अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णालयं रुग्णांना भरती करत नाहीये. रुग्णांची संख्याही वेगाने वाढते आहे. अशा स्थितीतही नेपाळच्या नागरिकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करत उत्सव साजरे करण्याचा प्रकार केलाय.

2/6
नेपाळमध्ये शनिवारी (15 मे) राजधानी काठमांडूमध्ये कोविड-19 निर्बंध असतानाही पावसाचा देव रातो (लाल) मछिंद्रनाथाची रथ यात्रा (Nepal Rath Yatra) काढण्यात आली. या उत्सवाला येथे रथ उत्सवाच्या नावानेच ओळखलं जातं. या उत्सवात अनेक लोक मास्क शिवाय आणि कोरोना नियमांचं उल्लंघन करताना दिसले.

3/6
यावेळी लोकांनी लाकडापासून बनवलेल्या खूप मोठ्या रथासोबत यात्रा काढली. या रथात मछिंद्रनाथांची मातीपासून बनवलेली मूर्ती होती. दरवर्षी होणारा हा उत्सव जवळपास महिनाभर चालतो. यात हजारो लोक सहभागी होतात. (Nepali Festival). मात्र, यंदा या यात्रेत कमी लोक सहभागी झाले होते. तसेच काही मीटर अंतरापर्यंतच ही यात्रा काढण्यात आली.

4/6
नेपाळमध्ये कोरोनाची स्थिती पाहता मागील महिन्यातच लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आला होता. नुकताच हा लॉकडाऊन आणखी 2 आठवडे वाढवण्यात आला.

5/6
मागील वर्षी देखील हा उत्सव साजरा करायला आलेल्या लोकांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं होतं. यानंतर पोलीस आणि जमावात झडप झाली. पोलीस लोकांना रथाजवळ जाण्यापासून रोखत होते. जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनीही कारवाई करत पाण्याचे फवारे आणि अश्रुधुराचा वापर केला. यात अनेक लोक जखमी झाले होते.

6/6
नेपाळमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 4 लाख 47 हजार 704 झालीय. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 4 हजार 856 लोकांचा मृत्यू झालाय (Coronavirus Situation in Nepal).

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI