Yemen War : हूती बंडखोरांच्या हल्ल्यांनंतर येमेनमध्ये भीषण युद्ध, 48 तासात 65 लोकांचा मृत्यू

येमेनमध्ये सरकार समर्थक सैनिक आणि हूती बंडखोरांमधील युद्ध वाढतच आहे. यात मागील तासात कमीत कमी 65 लोकांचा मृत्यू झालाय (Houthi Attack in Marib). बंडखोरांनी येमेनमधील मारिब शहरावर हल्ला केला. हा भाग येमेनमधील खनिज तेलानं संपन्न उत्तर भागात आहे.

Yemen War : हूती बंडखोरांच्या हल्ल्यांनंतर येमेनमध्ये भीषण युद्ध, 48 तासात 65 लोकांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Sep 03, 2021 | 7:42 PM

War in Yemen: येमेनमध्ये सरकार समर्थक सैनिक आणि हूती बंडखोरांमधील युद्ध वाढतच आहे. यात मागील तासात कमीत कमी 65 लोकांचा मृत्यू झालाय (Houthi Attack in Marib). बंडखोरांनी येमेनमधील मारिब शहरावर हल्ला केला. हा भाग येमेनमधील खनिज तेलानं संपन्न उत्तर भागात आहे. इराणचा पाठिंबा असलेली कट्टरतावादी संघटना हूतीने राजकीय दृष्टीनं महत्त्वाच्या मारिब शहरावर हल्ला केलाय. यात हूतीचे अनेक बंडखोर मारले गेलेत. मात्र, यानंतरही हूतीकडून हे युद्ध पुढे रेटलं जात आहे.

जून महिन्यानंतर मारिब शहरावर हूती बंडखोरांनी केलेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. याआधी जूनमध्ये दोन्ही गटांमध्ये तुंबळ युद्ध झालं. त्यात 3 दिवसात दोन्हीकडील एकूण 111 लोकांचा मृत्यू झाला (Yemen Houthis Backed by Iran). एएफपी वृत्तसंस्थेला येमेन सरकारच्या एका सैन्य अधिकाऱ्यानं सांगितलं, “48 तासांच्या आत सरकारचे सुरक्षा दलातील 22 सैनिकांचा मृत्यू झालाय आणि 50 इतर जखमी झालेत. दुसरीकडे 43 हूती बंडखोरांचा मृत्यू झालाय.’ मृतांच्या संख्येला सैन्य आणि डॉक्टर दोघांनीही दुजोरा दिलाय.

सौदी अरबच्या नेतृत्वातील येमेन सैन्य छावणीवर मोठा हल्ला, 30 जवानांचा मृत्यू, तर 60 सैनिक जखमी

दरम्यान, याआधी 29 ऑगस्टला येमेनमध्ये सौदी अरबच्या नेतृत्वातील येमेन सैन्य छावणीवर हूती बंडखोरांनी मोठा हल्ला केला. यात या छावणीतील जवळपास 30 सैनिकांचा मृत्यू झाला, तर 60 जवान जखमी झाले. हा हल्ला करण्यात आलेली छावणी सौदी अरबच्या नेतृत्वातील संयुक्त सेनेशी संबंधित होती. येमेनमधील साउदर्न फोर्सचे प्रवक्ते मोहम्मद अल-नकीब यांनी या हल्ल्याबाबत माहिती दिली. हूती बंडखोरांनी रविवारी (29 ऑगस्ट) अल-अनद सैन्य छावणीवर (al-Anad Military Base) हल्ला केला. ही छावणी सरकारच्या नियंत्रणातील दक्षिणी प्रांत लाहिजोमध्ये आहे.

हूती बंडखोरांनी या हल्ल्यासाठी सशस्त्र ड्रोन आणि बॅलेस्टिक मिसाईलचा वापर केला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सैन्य छावणीत सकाळच्या वेळी अनेक सैनिक त्यांचं प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी एक बॅलेस्टिक मिसाईल छावणीतील (Ballistic Missile Attack on Base) प्रशिक्षण विभागावर कोसळलं. यात या ठिकाणी उपस्थित असलेल्या अनेक सैनिकांचा मृत्यू झाला.”

सनावर ताबा मिळवल्यापासून युद्ध सुरू

हूती बंडखोरांनी 2014 मध्ये येमेनची राजधानी सनावर ताबा मिळवल्यापासून येमेन सरकार आणि हूती बंडखोरांमध्ये युद्ध सुरू आहे. हूतीने फेब्रुवारीत मारिब शहरावरही ताबा मिळवण्यासाठी हल्ला केला. यावेळी झालेल्या युद्धात दोन्हीकडील शेकडो लोकांचा मृत्यू झाला. अमेरिका आणि संयुक्त राष्ट्राने अनेकदा येमेनमधील युद्ध संपवण्याचं आवाहन केलंय (Yemen Houthis and Saudi Arabia). दुसरीकडे हूती बंडखोरांनी सना विमानतळ पुन्हा सुरू करण्याची मागणी केलीय. हे विमानतळ 2016 नंतर सौदी अरबने बंद केलंय. म्हणजेच सीझफायर होण्याआधीच हे विमानतळ बंद आहे. त्यामुळेच हूती बंडखोरांनी सौदी अरबवरही ड्रोन आणि मिसाईल हल्ले केलेत.

जगातील सर्वात मोठं मानवी संकट

सौदी अरब (Saudi Arabia) आणि संयुक्त अरब अमीरातच्या (United Arab Emirates) नेतृत्वातील संयुक्त सैन्याने मार्च 2015 मध्ये येमेनमध्ये अब्द-रब्बू मंसूर हादी यांच्या सरकारला सत्ता देण्यासाठी सैन्य हस्तक्षेप केला. मात्र, त्यानंतर या भागात मोठा संघर्ष उभा राहिलाय. यात आतापर्यंत हजारो सामान्य नागरिकांचा मृत्यू झालाय. या घटनाक्रमातूनच जगातील सर्वात मोठं मानवी संकट उभं ठाकलं आहे.

हेही वाचा :

Yemen: सौदी अरबच्या नेतृत्वातील येमेन सैन्य छावणीवर मोठा हल्ला, 30 जवानांचा मृत्यू, तर 60 सैनिक जखमी

सौदीच्या तेल विहिरींवर हल्ले, पेट्रोल-डिझेल दरवाढीने होरपळणाऱ्या भारताला पुन्हा चटके

यमनमध्ये पंतप्रधानांसह मंत्र्यांच्या विमानावर बॉम्ब हल्ला, दहा जणांचा मृत्यू

व्हिडीओ पाहा :

Houthi Attack on Marib city during war in Yemen

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.