AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती जो बायडेन यांना किती पगार मिळणार? जाणून घ्या

जो बायडेन जेव्हा राष्ट्रपती बनतील तेव्हा त्यांना किती पगार मिळेल? तुम्हाला माहित आहे का?

अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती जो बायडेन यांना किती पगार मिळणार? जाणून घ्या
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jan 06, 2021 | 3:03 PM
Share

वॉशिंग्टन : येत्या 20 जानेवारीला जोय बायडेन हे अमेरिकेचे 46 वे राष्ट्रपती म्हणून शपथ (How Much Annual Salary Joe Biden Will Get) घेणार आहेत. त्यासोबतच त्यांचं 2007 पासूनचं स्वप्नही पूर्ण होणार आहे. बायडेन जेव्हा राष्ट्रपती म्हणून व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफीसमध्ये पोहोचतील तेव्हा ते जगातील सर्वात शक्तीशाली पदाची सूत्र सांभाळतील (How Much Annual Salary Joe Biden Will Get).

जो बायडेन जेव्हा राष्ट्रपती बनतील तेव्हा त्यांना किती पगार मिळेल? तुम्हाला माहित आहे का? जो बायडेन यांना पगारासोबतच अनेकप्रकारचे भत्तेही मिळतात.

मनोरंजनासाठी 19,000 डॉलर

अमेरिकेच्या राष्ट्रपतींना दरवर्षी 400,000 डॉलर पगार मिळतो. म्हणजेच भारतीय रुपयांप्रमाणे जवळपास तीन कोटी रुपये. यामध्ये भत्ता म्हणून 50,000 डॉलर मिळतात. 1,00,000 डॉलर नॉन टॅक्‍सेबल ट्रॅव्हल अकाउंट असतो. तर मनोरंजनासाठी 19,000 डॉलर मिळतात. जर एका सामान्य अमेरिकेच्या कर्मचाऱ्याचा विचार केला तर तो वर्षाला 44, 564 डॉलर कमावतो. म्हणजेच जवळपास 32,60,828 रुपये कमावतो.

कधी किती पगार?

– वर्ष 1789 : 25,000 डॉलर : 18 लाख 29 हजार 295 रुपये

– वर्ष 1873 : 50,000 डॉलर : 36 लाख 58 हजार 590 रुपये

– वर्ष 1909 : 75,000 डॉलर : 54 लाख 87 हजार 885 रुपये

– वर्ष 1949 : 100,000 डॉलर : 73 लाख 17 हजार 180 रुपये

– वर्ष 1969 : 200,000 डॉलर : 1 कोटी 46 लाख 34 हजार 360 रुपये

– वर्ष 2001 : 400,000 डॉलर : 2 कोटी 92 लाख 66 हजार 920 रुपये

How Much Annual Salary Joe Biden Will Get

ट्रम्प यांनी किती पेन्शन मिळणार?

पगाराशिवाय एका अमेरिकन राष्ट्रपतीला लिमोजिन, मरीन वन आणि एअरफोर्स वनमध्ये होणाऱ्या यात्रा पूर्णपणे फ्री असते. सोबतच व्हाईट हाऊसमध्ये राहणंही फ्री असतं. तसेच, निवृत्त झाल्यानंतर माजी राष्ट्रपती सरकारी पेरोलवर असतात. दरवर्षी त्यांना 200,000 डॉलर म्हणजेच 1 कोटी 46 लाख 34 हजार 360 रुपये पेन्शन आणि आरोग्य विमा मिळतो.

त्याशिवाय, ऑफीशिअल प्रवासही मोफत असतो. 400,000 डॉलरच्या पगारासोबत राष्ट्रपती हे अमेरिकेत सर्वात जास्त पगार घेणारे व्यक्ती बनतात. मात्र, अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला म्हणजेच राष्ट्रपतींच्या पत्नीला कुठलाही पगार मिळत नाही.

How Much Annual Salary Joe Biden Will Get

संबंधित बातम्या :

कोरोना लसीकरणानंतर फिरायला जायचा प्लान करताय? पासपोर्टसोबत ‘हे’ सर्टिफिकेट दाखवावं लागू शकतं

चीनचा कुबेर अचानक बेपत्ता, सरकारसोबतचा वाद भोवला? प्रकरण काय?

अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...