चेहर्यावर पेट्रोल टाकून आग लावली, मग..बांग्लादेशात एका हिंदू माणसाबरोबर जे घडलं, ते ऐकून काळजाचा उडेल थरकाप
तब्येत अजून जास्त बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ढाका मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं. रुग्णालयात सीमा दास या छोट्या मुलाला छातीशी कवटाळून रडताना दिसल्या.

बांग्लादेशातील अल्पसंख्यांकाविरुद्ध हिंसाचाराच हादरवून सोडणारं एक प्रकरण समोर आलं आहे. राजधानी ढाक्यापासून 150 किलोमीटर अंतरावरील दूर गावात एका हिंदू व्यावसायिकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. पीडित व्यक्तीची पत्नी सीमा दास यांना, त्यांच्या नवऱ्यावर इतक्या क्रूर पद्धतीने का हल्ला करण्यात आलेला ते अजूनही समजलेलं नाही. NDTV शी बोलताना सीमा दास म्हणाल्या की, ‘त्याच्या कुटुंबाचं गावात कोणाबरोबर काहीही वाद नाहीय’ त्यांचे पती खोकोन चंद्र दास बुधवारी रात्री दुकान बंद करुन परत येत होते. त्याचवेळी अचानक त्यांच्यावर हल्ला झाला. आम्हाला फक्त शांततेत जगायचं आहे असं सीमा म्हणाल्या. “आम्ही हिंदू आहोत. कोणाचं नुकसान केलेलं नाही. मला माहित नाही की, माझ्या नवऱ्यावरच का हल्ला करण्यात आला?” असं सीमा दास म्हणाल्या.
सीमा दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांपैकी दोघे जण त्यांच्या पतीला ओळखत होते. हल्लेखोरांनी आधी धारदार शस्त्राने हल्ला केला. नंतर खोकेन यांच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकून आग लावली. जीव वाचवण्यासाठी खोकोन दास यांनी जवळच्या तलावात उडी मारली. हल्लेखोर घटनास्थळावरुन फरार झाले. गंभीररित्या आगीत होरपळलेल्या खोकोन दास यांना गावच्या लोकांनी जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. त्यांची तब्येत अजून जास्त बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ढाका मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात घेऊन जायला सांगितलं. रुग्णालयात सीमा दास या छोट्या मुलाला छातीशी कवटाळून रडताना दिसल्या. डॉक्टरांनी सीमा यांना सांगितलं की, तुमच्या नवऱ्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालाय. त्यांचा जीव वाचवण्यासाठी कमीत कमी सहायुनिट रक्ताची गरज आहे.
मुस्लिम व्यक्ती सुद्धा होता
खोकोन दास यांचं गावात मेडीकलचं दुकान आहे. त्याशिवाय मोबाइल बँकिंगच सुद्धा काम करतात. त्यांना तीन मुलं आहेत. आता कुटुंबावर अनिश्चित भविष्याच संकट आहे. खोकोन रुग्णालयात असताना गावातील काही लोक त्यांच्या मदतीसाठी धावून आले. यात एक मुस्लिम व्यक्ती सुद्धा होता. हे सांप्रदायिक प्रकरण नाहीय. कुटुंबाची मी शक्यतो ती सर्व मदत करतोय असं या मुस्लिम व्यक्तीने सांगितलं. बांग्लादेशात हिंदुंवर होणाऱ्या हल्ल्याच्या पॅटर्नबद्दल त्याला विचारण्यात आलं, त्यावर त्याचं चौकशी सुरु आहे असं सरळ उत्तर होतं.
