भारताच्या एका आदेशाने पाकिस्तानला फुटला घाम, गडबडीत घेतला मोठा निर्णय, आता सीमेवर…
भारातच्या एका आदेशानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानची सेना आता हायअलर्टवर गेली आहे. एखादा हल्ला झाला तर त्याला प्रत्युत्तर द्या, असे पाकिस्तानी सेनेला सांगण्यात आले आहे.

India Vs Pakistan : पाकिस्तान सध्या दहशतवादी कारवायांनी त्रस्त आहे. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानमध्ये काही ठिकाणी बॉम्बस्फोट झालेले आहेत. यात सामान्य नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. दुसरीकडे टीटीपी आणि बीएलए या दोन दहशतवादी संघटनांच्या कारवायादेखील वाढल्या आहेत. असे असतानाच आता भारताच्या या सीक्रेट मिशननंतर पाकिस्तानचे टेन्शन वाढले आहे. पाकिस्तानने आपल्या लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचा आदेश दिल्याचे म्हटले जात आहे. भारताने नोटीस टू एअरमन म्हणजेच NOTAM जारी केले आहे. त्यामुळे पाकिस्तानी सेना अलर्ट झाली आहे. भारत एखाद हल्ला करतो की काय, असी चिंता आता पाकिस्तानला लागली आहे.
भारत नेमकं काय करतोय?
मिळालेल्या माहितीनुसार भारताने NOTAM जारी केले आहे. भारत येत्या 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा NOTAM जारी करण्यात आला आहे. म्हणजेच या आदेशानुसार आता 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात भारताने सांगितलेल्या हवाई क्षेत्रातून कोणतेही विमान जाणार नाही. निर्देशित काळासाठी ते क्षेत्र पूर्णपणे नो फ्लाय झोन असेल. विशेष म्हणजे भारताने हा NOTAM पश्चिम सीमाभागात पाकिस्तानलगत असलेल्या प्रदेशासाठी लागू केला आहे. याच कारणामुळे पाकिस्तानची धाकधूक वाढली आहे. पाकिस्तानने भूदल, नौदल आणि वायूदलाला अलर्ट राहण्याचा आदेश दिला आहे.
तिन्ही दलांचा एकत्रित अभ्यास
भारतात येत्या 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या काळात ट्राय सर्व्हिसेस अभ्यास म्हणजेच वायूदल, भूदल आणि नौदल या तिन्ही दलांचा एकत्रित अभ्यास होणार आहे. भारताच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा नियमित अभ्यासांपैकीच एक अभ्यास आहे, असे सांगितले आहे. तर आंतरराष्ट्रीय सीमांवर संयुक्त ऑपरेशन्सची तयारी सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करणे ही सामान्य बाब आहे, असे लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. पाकिस्तानने मात्र भारताच्या या NOTAM आदेशाची गंभीर दखल घेतली आहे.
पाकिस्तानने काय तयारी केली?
मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानने सिंध आणि दक्षिण पंजाब या भागात लष्कराला हाय अलर्टवर राहण्याचा आदेश दिला आहे. वायूसेना तसेच नौसेनेला कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास सांगण्यात आले आहे. बहावलपूर स्ट्राईक कोअर आणि कराची (सिंध) कोअरला विशेष सतर्कता बाळगण्याच सांगितलेले आहे. रकोट, बहावलपुर, रहिम यार खान, जेकबाबाद, भोलारी आणि कराची येथील वायूसेनेच्या तळांनाही तयार राहण्याचे सांगण्यात आले आहे. अरबी सागरात पाकिस्तानी नौसेनेने गस्त वाढवण्याचाही आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान, भारताच्या NOTAM आदेशानंतर आता पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताकडून तिन्ही दलांचा हा नियमित अभ्यास असल्याचे सांगितले जात असले तरी पाकिस्तानने मात्र हाय अलर्टवर राहण्याचे ठरवल्यामुळे भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
