AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explained : फक्त आदेशाची प्रतिक्षा, बस…यावेळी पाकिस्तानवर पहिला वार कुठल्या बाजूने होणार?

India Pakistan War Situation : दिवस, वेळ जसा-जसा पुढे सरकतोय, तशी-तशी पाकिस्तानची बेचैनी, अस्वस्थतता वाढत चालली आहे. तिथल्या शासकांची झोप उडालीय. भारतात घडणाऱ्या घडामोडी यावेळी काहीतरी मोठ घडणार असल्याचे संकेत देत आहेत. भारत यावेळी गप्प बसणार नाही, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला जरुर घेणार हे आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांना कळून चुकलय.

Explained : फक्त आदेशाची प्रतिक्षा, बस...यावेळी पाकिस्तानवर पहिला वार कुठल्या बाजूने होणार?
India vs Pakistan Image Credit source: TV9 Hindi
| Updated on: May 05, 2025 | 9:01 AM
Share

भारताच्या युद्ध तयारीने पाकिस्तानची अस्वस्थतता वाढत चालली आहे. कारण भारताने रणनितीक आघाडीवर पाकिस्तानची घेराबंदी सुरु केली आहे. सोबत कूटनितीक आघाडीवर सुद्धा पाकिस्तानच्या प्रत्येक चालीला अयशस्वी केलय. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील पाच पैकी चार स्थायी सदस्यांनी दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताला साथ देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरता हतबल झाला आहे. तिथल्या शासकांची झोप उडाली आहे. भारत हल्ला करणार या भितीने बेचेनी, अस्वस्थतता वाढत चालली आहे. भारतात ज्या प्रकारच्या हालचाली सुरु आहेत, त्यावरुन यावेळी मोठं काहीतरी घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकाबाजूला पीएम मोदी सतत सैनाध्यक्षांसोबत बैठका करुन माहिती घेत आहेत. NSA आणि CDS कडून Action प्लानची माहिती घेत आहेत. या दरम्यान बॉर्डरवर सैन्य तैनाती वाढवली असून दुसऱ्याबाजूला फ्रान्सबरोबर आणखी राफेल खरेदीचा करार झाला आहे.

समुद्रात नौदलाची तैनाती वाढवली आहे. भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला जरुर घेणार हे आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ यांना कळून चुकलय. पण यावेळी हल्ला कुठून होणार? कुठल्या फ्रंटने मोर्चा उघडला जाणार? हे पाकिस्तानी शासकांना कळत नाहीय. ते जाणून घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहे. सध्या भारत पाकिस्तानसोबत सायकोलॉजिकल वॉर खेळत असून त्यात विजयी सुद्धा ठरला आहे. पाकिस्तानच्या सर्व सैन्य ठिकाणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलय. त्यांनी सैनिकांची सुट्टी रद्द केली आहे.

कधीही पाकिस्तानच्या बरबादीचा आदेश निघेल

पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISI चा भारतात सुरु असलेली प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी प्रयत्न सरु आहेत. पण भारताच ऑपरेशन खूपच गोपनीय आहे. याआधी सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइकने पाकिस्तानच्या पायाखालची जमीन सरकली होती. यावेळी सुद्धा तसाच काहीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कधीही पाकिस्तानच्या बरबादीचा आदेश निघू शकतो. त्यासाठी भारतीय सैन्याचे कमांडो सज्ज आहेत.

या क्षेपणास्त्राने पाणी-जमीन-आकाश तिन्ही ठिकाणहून हल्ला शक्य

भारताने ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूज मिसाइल वॉर रेडी केलय. राफेल-सुखोई फायटर जेटद्वारे ब्रह्मोसचा प्रहार होईल. एअरबेसवर ब्रह्मोसने सुसज्ज राफेल हल्ल्यासाठी तयार आहेत. सुखोई 30MKI मधून सुद्धा ब्रह्मोसद्वारे पाकिस्तानवर हल्ला होऊ शकतो. ब्रह्मोसचा स्पीड 3500 से 3800 किमी/प्रतितास आहे. ब्रह्मोसची रेंज 800 ते 1000 किमी आहे. वॉर हेड क्षमता 200-300 किलो आहे. ब्रह्मोस रशियाच्या सहकार्याने बनवण्यात आलेलं क्षेपणास्त्र आहे. ब्रह्मोस पाणी-जमीन-आकाश तिन्ही ठिकाणहून हल्ला करण्यासाठी सक्षम आहे. पाकिस्तानी एअर बेस हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहेत.

फक्त आदेशाची प्रतिक्षा

पाकिस्तान संदर्भात जरुर कुठलातरी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कारण 12 तासांच्या आत पीएम मोदी सैन्यदलाच्या तिन्ही प्रमुखांना भेटले. या बैठकीत काय चर्चा झाली, ते समजलेलं नाही. हा, पण बैठकीनंतर लगेच सीमेवर तैनाती वाढवण्यात आली आहे. समुद्रात अलर्ट जारी करण्यात आलाय. आंतकिस्तानची कंबर तोडण्यासाठी सैन्य पूर्णपणे सज्ज आहे. फक्त आदेशाची प्रतिक्षा आहे.

ब्लूप्रिंट तयार आहे

रणनितीक आघाडीवर पाकिस्तानची घेराबंदी सुरु आहे. पाणी-जमीन-आकाश तिन्ही ठिकाणाहून हल्ल्याची ब्लूप्रिंट तयार आहे. त्यामुळे पाकिस्तानचा विनाश अटळ. कूटनितीक आघाडीवर सुद्धा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानची सर्व चालबाजी नाकाम ठरली आहे. भारताने संयुक्त राष्ट्रात पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानच्या सहभागाचे पुरावे दिले आहेत. UNSC मध्ये पाकिस्तान उघडा पडलाय.

UNSC कोणाच्या बाजूने?

त्याशिवाय भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी UNSC मध्ये चार स्थायी सदस्य देशांशी चर्चा केली आहे. UNSC चे चारही स्थायी सदस्य दहशतवादाविरुद्ध लढाईत भारतासोबत आहेत. फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका आणि रशियाने प्रत्येक प्रकारच्या मदतीसाठी तयार असल्याच आश्वासन दिलय. अमेरिकेने भारताची साथ देण्याच्या आश्वासनचा पुनरुच्चार केला आहे. पाकिस्तान पूर्णपणे बॅकफुटवर आला आहे. कारण अमेरिकेकडे विनवणी करुन सुद्धा काही फायदा झालेला नाही.

पाकिस्तानचे सर्व दावे फेल

भारताच्या कूटनितीक चालीसमोर पाकिस्तानचे सर्व दावे फेल गेलेत. 24 एप्रिलला फ्रान्सचे परराष्ट्र मंत्री जीन नोएल यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 27 एप्रिलला ब्रिटेनचे परराष्ट्र मंत्री डेविड लॅमी यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी चर्चा केली. 30 एप्रिलला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रूबियो यांनी सुद्धा जयशंकर यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. 3 मे रोजी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी जयशंकर यांच्यासोबत चर्चा केली. त्याशिवाय अरब देश सुद्धा दहशतवादाविरुद्धच्या या लढाईत भारतासोबत आहेत. आता भारताचं पुढचं पाऊल काय असणार? यामुळे पाकिस्तानी नेत्यांमध्ये टेन्शन आहे.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.