PM Modi : चीन की अमेरिका, भारताचा सर्वाधिक व्यापार कोणाशी? कोण जास्त महत्वाचं ?
India-America-China Trade : पंतप्रधान मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेतक, तेथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी झालेल्या भेटीदरम्यान ग्लोबल ट्रेड आणि टॅरिफच्या मुद्यावर चर्चा केली. अमेरिकेसोबतच्या टॅरिफ वॉरनंतर, भारताने चीनसोबतचा व्यापार सुधारण्यासाठी काम सुरू केले आहे. या दोन देशांसोबत भारताचा किती व्यापार आहे आणि त्याचा कुठे फायदा होतो आणि कुठे तोटा, जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत, तेथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी जागतिक व्यापारावरही चर्चा केली आणि त्याच्या स्थिरतेवर भर दिला. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर या वॉरच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. चीन आणि अमेरिका हे दोन्ही भारताचे सर्वात मोठे व्यापारी भागीदार आहेत. अमेरिकेने 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, भारताने चीनसोबत व्यापार वाढवण्याच्या रणनीतीवर काम सुरू केले आहे. . जागतिक बाजारपेठेतील समीकरणं बदलत असून चीन आणि अमेरिका या दोन देशांशी भारताचा किती व्यापार आहे, कोणासोबतच्या व्यापारात किती नफा, किती नुकसान होतं, ते सविस्तर जाणून घेऊया.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रथम 7 ऑगस्ट रोजी भारतावर २५ टक्के कर लादला आणि नंतर 27 ऑगस्टपासून रशियाकडून तेल खरेदीच्या आधारावर तो कर आणखी 25 टक्के वाढवलाय. यामुळे भारतावर आता एकूण 50 टक्के कर लावण्यात आला असून यामुळे भारताच्या सुमापे 50 ते 60 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीवर याचा परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आव्हानादरम्यान, भारताच्या चीनसोबतच्या व्यापारी संबंधांना पुन्हा आकार देणे अधिक महत्त्वाचे बनले आहे. या रणनितीनुसार, पुढे जाण्याचा एक भाग म्हणून, पंतप्रधान मोदी हे गेल्या 5 वर्षांत पहिल्यांदाच चीनला भेट देत आहेत.
भारत आणि चीनमध्ये किती होतो व्यापार ?
भारताचा सर्वाधिक व्यापार चीनसोबत आहे यात काहीच दुमत नाही. पण त्यातील एकमेव समस्या म्हणजे आपण चीनकडून जास्त खरेदी करतो आणि कमी विक्री करतो, अर्थात आयात अधिक आणि निर्यात कमी. याच कारणामुळे चीनसोबतची आपली व्यापार तूट सतत वाढत आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात चीनसोबतचा एकूण द्विपक्षीय व्यापार 127.7 अब्ज डॉलर्स होता, तर 2022 -23 मध्ये हाच आकडा 136 अब्ज डॉलर्स इतका होता. तथापि, गेल्या आर्थिक वर्षातील एकूण उलाढालीत 99.2 अब्ज डॉलर्सची व्यापार तूट होती कारण भारताने चीनला केवळ 14.3 अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या आणि त्यांच्याकडून113.5 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी केल्या. चालू आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, एप्रिल ते जुलै या कालावधीत, चीनसोबत 34.9 अब्ज डॉलर्सचा व्यापार झाला आहे. या कालावधीत, आपण (भारत)5.75 अब्ज डॉलर्सच्या वस्तू विकल्या आहेत, तर 40.65 अब्ज डॉलर्सच्या वस्तू खरेदी केल्या आहेत.
चीन-भारत व्यापार आकडेवारी
2024-25 मध्ये एकूण व्यापार : 127.7 अब्ज डॉलर्स
आयात : 113.5 अब्ज डॉलर्स
निर्यात : 14.3 अब्ज डॉलर्स
व्यापार तूट : 99.2 अब्ज डॉलर्स
अमेरिकेशी किती होतो व्यापार ?
अमेरिका हा आपला दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे आणि तो चीनपेक्षाही महत्त्वाचा आहे. याचे कारण असे की भारताला चीनसोबतच्या व्यापारात तोटा सहन करावा लागत असला तरी अमेरिकेसोबत आपला व्यापार सरप्लस असतो. म्हणजे अमेरिकेत आपण निर्यात जास्त करतो (विक्री जास्त) आणि आयात कमी ( खरेदी कमी करतो.) 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने अमेरिकेला 86.7 अब्ज डॉलर्सची निर्यात केली, तर आयातीची म्हणजे खरेदीची आकडेवारी, किंमत ही 42.2 अब्ज डॉलर्स होती. अशाप्रकारे, भारताला 44.5 अब्ज डॉलर्सचा व्यापार अधिशेष मिळाला आहे. हा एकूण व्यापार 128.9 अब्ज डॉलर्स होता, जो चीनपेक्षा जास्त आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात अमेरिका आणि भारत यांच्यातील एकूण व्यापार 118.28 अब्ज डॉलर्स होता.
भारत-अमेरिका व्यापार आकडेवारी
2024-25 मध्ये एकूण व्यापार: 128.9 अब्ज डॉलर्स
आयात : 42.2 अब्ज डॉलर्स
निर्यात : 86.7 अब्ज डॉलर्स
ट्रेड सरप्लस : अब्ज डॉलर्स
